esakal | ‘ही’ बँक ग्रामीण महिलांची जीवनवाहिनी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आता पोस्ट बँकेच्या पेपरलेस कामकाजामुळे पैसे काढणे व जमा करणे सोपे झाल्याने पोस्ट बँक ग्रामिण भागातील महिलांसाठी संजीवणी ठरत आहे. 

‘ही’ बँक ग्रामीण महिलांची जीवनवाहिनी

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : आदिवासी भागातील घरकाम व बचतगट व मोलमजुरी आणि गृहउद्योग चालविणाऱ्या महिलेला पूर्वी बँकेत पैसे जमा व काढण्याकरिता फॉर्म भरून घेण्यासाठी कोणाची तरी मदत घ्यावी लागत होती. परंतु आता पोस्ट बँकेच्या पेपरलेस कामकाजामुळे पैसे काढणे व जमा करणे सोपे झाल्याने पोस्ट बँक ग्रामिण भागातील महिलांसाठी संजीवणी ठरत आहे. 

सध्या डिजिटल काळ आहे. त्याप्रमाणे जवळपास सर्वच विभाग आपल्या ग्राहकांना उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही भारत सरकारची बँक आहे. ही बँक संपूर्ण डिजिटल व पेपरलेस बँक आहे. ग्रामीण भागात व आदिवासी भागात महिलांसाठी ही बँक संजिवनी बनली असल्याने या बँकेचे सर्व आर्थिक व्यवहार घरपोच पोस्टमन मार्फत मिळत आहेत. यामुळे बचतगट मार्फत लहान- मोठे व्यवसाय करीत असलेल्या महिलांना थेट पैसे हातात पडत आहेत. यामुळे कोरोनाच्या संकटकाळी देखील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचे चाक सुरू ठेवण्यात पोस्ट बॅंकेचा मोठा वाटा आहे.

पुरुषांच्या हाताकडे पाहण्याची वेळ येत नाही

या बँकेमुळे महिलांचे जनधन, किसान सन्मान योजना, निराधार, गॅस अनुदान, जेष्ठ नागरिक अनुदान, गरोदर मातेचे अनुदान, कोणत्याही बँकेतील पैसे पोस्ट बँकेच्या Aeps द्वारे पोस्टमन घरपोच थेट महिलांच्या हातात देत असल्याने स्वत: महिला याचा उपयोग शेतीचे कामे, लहान मोठ्या उद्योधंदा आणि घरगुती उपयोग करीत असल्याने पुरुषांच्या हाताकडे पाहण्याची वेळ येत नाही.

हेही वाचा -  नांदेड : दहा दिवसावर आलेल्या लग्नघरचा काका- पुतन्या अपघातात ठार

कोणताही फॉर्म भरून देण्याची गरज नाही

या पोस्ट बँकेतून कोणत्याही बँकेचे पैसे काढण्यासाठी कोणताही फॉर्म भरून देण्याची गरज नाही.
सही करण्याची गरज नाही. किती शिकला असलेल्या ग्राहकांना हाताचा अंगठा दिला की आपल्याला आपल्या आवश्यकताप्रमाणे पैसे पोस्टमन घरपोच काढून देतो ते पण कोणताही मोबदला न घेता.

बँकेतील पैसे काढून देण्याची मोहीम

नांदेड : भिशी (ता. किनवट) येथील पोस्टमन यांनी लॉकडाउनच्या भीषण संकटकाळी पेरणीसाठी पैसे कमी पडू नये म्हणून कोणत्याही बँकेत आपले खाते असू द्या. त्या खात्यातील रोख रक्कम पोस्टमनमार्फत Aeps द्वारे प्रत्येकाला घरपोच किंवा शेतात काढता येणार आहे.

याचं योजनेचा लाभ भिशी येथील एका शेतकऱ्यांच्या शेतावर पोस्टमन जाऊन स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतील पैसे कोणतेही मोबदला न घेता पोस्ट बँकेच्या Aeps द्वारे काढून दिले.
या शेतकऱ्यांचे बाहेरगावी जाण्याचा वेळ बचत झाला. रांगेत तासोनतास उभे राहावे लागले असते, वेळेची बचत झाली आणि जाण्या- येण्याच्या खर्चाची बचत झाली एवढेच नाही तर घरपोच पैसे मिळाले.
पोस्ट बँकेबदल शेतकऱ्यांना खूप आकर्षण झाल्याचे डाक अधीक्षक शिवशंकर लिंगायत यांनी सांगितले.