अबब...! चक्क पोलिस निरीक्षकालाच मारहाण...कुठे ते वाचा

file photo
file photo

नांदेड : कर्तव्यावर जाण्यासाठी निघालेल्या पोलिस निरीक्षकाचे वाहन अडवून वाद घातला. एवढेच नाही तर चक्क कॉलर धरून दोघांनी मारहाण केल्याचा प्रकार मुक्ताईनगर रोड, लोहा येथे शनिवारी (ता. १३) सांयकाळी साडेचारच्या सुमारास घडला. या दोघांनाही अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षकाला मारहाणीची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येते.
 
लोहा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र कऱ्हे हे आपल्या खासगी वाहनाने मुक्ताईनगर मार्गे पोलिस ठाण्याकडे जात होते. वेळ दुपारची चारची. यावेळी त्यांच्या वाहनामागून नागेश गोविंद आंबेकर आणि तानाजी चव्हाण दोघे रा. लोहा हे (एमएच१२-जेयु- ९५२८) मधून जात होते. दारुच्या नशेत असल्याने त्यांना समोर लोहा पोलिस ठाण्याचे ठाणेदार गाडी चालवत आहेत हे माहित असतानाही त्यांनी नशेत जोरजोराने हॉर्न वाजवुन गाडी वेडीवाकडी चालवु लागले. 

शासकिय कामात अडथळा 

काही अंतरावर गेल्यानंतर चक्क त्यांनी आपली कार निरीक्षक कऱ्हे यांच्या वाहनासमोर लावून त्यांची गाडी अडविली. दारुच्या नशेत गोंधळ घालून श्री. कऱ्हे यांना शिविगाळ केली. विशेष म्हणजे कऱ्हे हे वर्दीवर होते. तरीसुध्दा त्यांना त्यांचे वर्दीवरच कॉलर धरले व मारहाण केली. हा प्रकार रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेकांनी पाहिला. मोठमोठ्याने अरडून परिसरात या दोघांनी दहशत पसरविली. शासकिय कामात अडथळा निर्माण केला. 

लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा 

यानंतर या दोघांनाही पोलिस निरीक्षक कऱ्हे यांनी ताब्यात घेऊन आपले कर्मचारी बोलावून घेतले. कर्मचाऱ्यांनी आपल्या साहेबाला मारहाण करण्यांची चांगलीच धुलाई केली. त्यानंतही ठाण्यात नेऊन त्यां सुंदरीचा चांगलाच प्रसाद दिल्याचे सांगण्यात आले. पोलिस निरीक्षक रविंद्र कऱ्हे यांच्याफिर्यादीवरुन लोहा पोलिस ठाण्यात नागेश आंबेकर आणि तानाजी चव्हाण यांच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. राठोड करत आहेत. 

पोलिस निरीक्षकाला जिल्ह्यात पहिल्यांदाच मारहाण

पोलिस म्हंटले की भल्या- भल्यांची भंबेरी उडत असते. मात्र काही ठिकाणी गुन्हेगारांकडून फौजदार, पोलिस शिपाई यांच्यावर हात उगारण्याचे प्रकार घडले होते. मात्र आता तर चक्क पोलिस निरीक्षकाची गाडी अडवून त्यांना गाडीतून ओढून काढून वर्दीवर भरदुपारी सार्वजनिक ठिकाणी मारहाण करण्यात आली. यामुळे पोलिस दलाची प्रतिमा कुठेतरी डागाळली की काय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पोलिसांचा जर वचक गुन्हेगारावरील कमी झाला किंवा जर पोलिसच मार खाऊ लागले तर सर्वसामान्य नागरिकांना संरक्षण कोण देईल असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com