
थकीत रक्कम तात्काळ मिळावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अनंद सिनगारे यांनी आंदोलनचा ईशारा देण्यात आला आहे. तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष साबेर शेख यांनी आत्मदहनाचा ईशारा दिला होता.
अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : शहरातील घरकुल लाभार्थ्यांचा थकीत रक्कम मिळत नसल्यामुळे जीव मेटाकुटीला असून हे लाभार्थी कर्जबाजारी झाले आहेत. खासगी सावकार पैसे वसुलीसाठी तगादा लावत असून लाभार्थ्यी नगरपंचायतीकडे चकरा मारत आहेत. शहरातील लाभार्थ्यांची सुमारे साडेचार कोटी रक्कम थकीत आहे.
थकीत रक्कम तात्काळ मिळावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अनंद सिनगारे यांनी आंदोलनचा ईशारा देण्यात आला आहे. तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष साबेर शेख यांनी आत्मदहनाचा ईशारा दिला होता. प्रशासनाच्या आश्वासनानंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या साठेमारीत लाभार्थ्यी मात्र भरडला जातोय. तसेच खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या जनता दरबारात लाभार्थ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत.
हेही वाचा - मालवाहतुकीमध्ये नांदेड रेल्वे विभाग अग्रेसर, सव्वापाच कोटीचा महसुल मिळवला
घर बघावे बांधून असे म्हंटले जाते. याचा चांगला अनुभव सध्या अर्धापूर शहरातील लाभार्थ्यांना येत आहे. शहरात पंतप्रधान आवास योजनेतून बांधण्यात आलेल्या घरकुल लाभार्थ्यांची व्यथा काही वेगळीच झाली आहे. शासनाचे अनुदान वेळेवर मिळेल या आशेने स्वत: ची जमा पुंजी खर्च करुन व उधार उसनवारी करुन घरकुल बांधले. घरकुलाच्या अनुदानाचे रडपडत तीन हाप्ते मिळाले. पण शेवटचा एक लाखांचा हप्ता थकल्याने हे लाभार्थ्यांची खुप मोठी अर्थिक कोंडी होत आहे. काही लाभार्थ्यी कर्जबाजारी झाले तर काहिनी सोयरे, मित्र यांच्या पैसा उसने आणले आहेत. हे सर्व वसुलीसाठी तगादा लावत आहेत. तर खासगी सावकारांचे व्याज वाढत आहे. केंद्राकडील थकलेली रक्कम मिळावी यासाठी नगराध्यक्षा सुमेरा बेगम यांनी निवेदन देवून मागणी केली आहे.
संपादन - प्रल्हाद कांबळे