esakal | अर्धापुरात भाजप महिला आघाडीचे रास्ता रोको आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

 भाजप

अर्धापुरात भाजप महिला आघाडीचे रास्ता रोको आंदोलन

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जि.नांदेड) : राज्यातील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) शासनाच्या काळात महिला असुरक्षित असून अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या शासनाला आंदोलन करून जाग येत नाही, म्हणून जागृत देवस्थान असलेल्या सत्यगणपतीला महिलांच्या सुरक्षतेसाठी साकडे घालण्यात आले आहे, असे महिला आघाडीच्या प्रदेश (BJP Mahila Morcha) उपाध्यक्षा प्रणिता देवरे चिखलीकर यांनी बुधवारी (ता १५) यांनी सांगितले. महिला आघाडीच्या वतीने महिला सुरक्षतेसाठी सत्य गणपतीला साकडे घालून रास्त रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास खूप मोठा प्रतिसाद मिळाला. राज्यातील वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनेच्या (Nanded) निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने साकडे आंदोलन करण्यात आले.सत्यगणपती (Ardhapur) देवस्थानाच्या परिसरात महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरे चिखलीकर यांच्या नेतृत्वाखालील साकडे घालून गणपतीला महिला सुरक्षेतेसाठी प्रार्थना करण्यात आली.

हेही वाचा: Engineers Day: लयभारी! शेतकरी कुटुंबात तब्बल आठ अभियंते

राज्यातील वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनेचा निषेध करून नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. तसेच नांदेड-अर्धापूर या रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राज्यातील आघाडी सरकारवर तीव्र शब्दात टीका करण्यात आली. या आंदोलनात महानगराध्यक्ष प्रवीण साले, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, शितल भालके, नगरसेवक दिलीपसिंग सोडी, व्यंकट मोकले, दिलीप ठाकूर, व्य़ंकट जिंदम, महादेवी मठपती, अनुराधा गिराम, वर्षा बंगाळे,मेघा स्वामी, सखाराम क्षिरसागर, नागोराव भांगे, शिवराज जाधव, विलास साबळे, आशिष नेरळकर, विजय गंभीरे, बालाजी स्वामी, जठन मुळे, तुळशीराम ब़ंडाळे, आत्माराम राजेगोरे, अमोल कपाटे, प्रभू कपाटे, कुश भांगे आदी पदाधिकारी सहभागी झाले.

loading image
go to top