esakal | Engineers Day: लयभारी! शेतकरी कुटुंबात तब्बल आठ अभियंते
sakal

बोलून बातमी शोधा

अर्धापूर तालुक्यातील रोडगी येथील शेतकरी मुळे कुटुंबातील अभियंते.

Engineers Day: लयभारी! शेतकरी कुटुंबात तब्बल आठ अभियंते

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जि.नांदेड) - तालुक्यातील (Ardapur) रोडगी या छोट्याशा गावात शेती हा प्रमुख व्यवसाय. शेतीच्या मशागती सोबत शैक्षणिक क्षेत्रात येथील मुळे कुटुंबीयांची गगन भरारी घेत एक आदर्श निर्माण केला आहे. या शेतकरी कुटुंबात तब्बल आठ अभियंते झाले आहेत. ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करित आहेत. ग्रामीण भागात ही शेतकरी कुटुंबात अभियंते होऊन आपल्या कामाचा जोरवार यशस्वी होऊ शकतात. हे यांनी आपल्या कृतीने सिद्ध केले आहे. या कुटुंबात स्थापत्य (Nanded) अभियंता, संगणक, इंस्टूमेंटल अभियंता आदी विभागात अभियंता म्हणून यशस्वी झाले आहेत. भारतरत्न सर मोक्षगु़ंडम विश्वेश्वरेैय्या यांचा जन्म दिन हा अभियंता दिन (Engineers Day) म्हणून साजरा केला जातो. देशाच्या जडण-घडणीत अभियंत्यांची भूमिका खूप महत्त्व आहे. रस्ते, धरणे, भव्य इमारतीसह विविध क्षेत्रात अभियंता उल्लेखनीय कामगिरी करित असतो. देशात १५ सप्टेंबर हा दिवस अभियंता दिवस साजरा करून अभियंत्यांचा गौरव करण्यात येतो.

हेही वाचा: Motivational Story : नांदेडचे भूमिपुत्र मुकुंद सरसर कर्नलपदी

कृषी अभियांत्रिकी सोबत शैक्षणिक क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेऊन रोडगीच्या मुळे पाटील परिवाराने उत्तुंग भरारी घेतली आहे. रोडगी येथील कामाजी व माणिकराव मुळे या बंधुंनी शेती सोबत आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले व शिक्षणाची बिजे रूजवली. या कुटुंबात शरद मुळे हे पहिले अभियंता झाले. त्यांचा आदर्श घेऊन कुटुंबात शैक्षणिक प्रगतीचे वारे वाहू लागले. ते जलसंपदा विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. या कुटुंबातील दुसऱ्या पिढीने वारसा पुढे चालवत दीपक मुळे स्थापत्य अभियंता झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध प्रकल्प सुरू आहेत. अविनाश मुळे(मेकॅनिकल इंजिनिअर), प्रसाद मुळे (इंस्टूमेंटल अभियंता), निखिल मुळे (पेट्रोकेमिकल अभियंता), कृष्णा मुळे(मेकॅनिकल अभियंता), ज्ञानेश्वर मुळे (संगणक अभियंता), राणी मुळे (संगणक अभियंता), अमृता मुळे ( संगणक अभियंता) हे अभियंता झाले असून पुण्यात व नांदेड येथे कार्यरत आहेत. पुण्यात टाटा मोटर्समध्ये अविनाश व ज्ञानेश्वर मुळे कार्यरत आहेत. रोडगी येथील प्रगतिशील शेतकरी मधुकर मुळे यांचे हे अभियंते पुतणे आहेत. आमच्या कुटुंबाचा शेती हा प्रमुख व्यवसाय. आमचे आजोबांनी आम्हाला शेतीसोबत शिक्षणाची बीजे रोवली. शिक्षणामुळे आमच्या कुटुंबात प्रगतीचा आलेख उंचावत गेला आहे. शेतीसोबत शिक्षणाला प्राधान्य देणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया दीपक मुळे (स्थापत्य अभियंता) यांनी दिली.

loading image
go to top