

Nanded Municipal Politics: High Court Suspends AIMIM Opposition Leader Appointment
sakal
नांदेड : नांदेड-वाघाळा महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी एमआयएमचे मसूद खान यांची केलेली नियुक्ती औरंगाबाद खंडपीठाने अंतरिम स्वरूपात स्थगित केली. या प्रकरणी महापौर, मनपा आयुक्त, मसूद खान यांच्यासह संबंधित प्रतिवादींना चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. या निर्णयाने भाजप, एमआयएमला धक्का मानला जात आहे.