esakal | गोळीबार व दरोड्यातील दोघांना हैदराबाद येथून अटक- एलसीबी नांदेड
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

या घटनेतील चार जणांना अटक केली होती. यातील देघोजण फरार होते. या दोघांना काडीगुडा (हैद्राबाद) येथून शुक्रवारी (ता. १६) रात्री अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. 

गोळीबार व दरोड्यातील दोघांना हैदराबाद येथून अटक- एलसीबी नांदेड

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहराच्या विविध भागात पिस्तुलचा धाक दाखवून खंडणी वसुल करणारी टोळी सक्रीय झाली होती. याच टोळीने गुन्हेगारी जगतात आपले वर्चस्व रहावे म्हणून इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुना मोंढा परिसरातील रंजीतसिंह मार्केटमध्ये ता. चार ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास पिस्तुलाचा धाक दाखवून गोळीबार केला होता. यात एकजण जखमी झाला होता. या घटनेतील चार जणांना अटक केली होती. यातील देघोजण फरार होते. या दोघांना काडीगुडा (हैद्राबाद) येथून शुक्रवारी (ता. १६) रात्री अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. 

शहरात व जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करुन कारागृहात पाठवा अशा सुचना देऊन सध्या सण उत्सवाचे दिवस असल्याने समाजकंटकावर लक्ष ठेवण्याचे आदेश पोलिस ठाणेदारांना दिल्या. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनाही यात विशे, लक्ष घालून थेट कारवाया करण्याच्या सुचना दिल्या. यानंतर श्री. चिखलीकर यांनी गोळीबार व विविध गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती यांच्या पथकाला सतर्क केले. हे पथक दोन दिवसापूर्वी हैद्राबाद राज्यात विविद भागात दबा धरुन बसलेल्या गुन्हेगारांचा शोध घेत होते. 

हेही वाचानांदेड : खाकीला लाचेचा डाग तर महसूल वाळूमुळे दुसऱ्या क्रमांकावर -

गोळीबारात पानपट्टी चालक आकाशसिंह परिहार हा जखमी झाला होता

सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग भारती यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री काचीगुडा येथे कारवाई करत लख्खन दर्शनसिंग ठाकूर (वय २९) आणि विक्की दर्शनसिंग ठाकूर (वय ३१) दोघे राहणार चिखलवाडी नांदेड या दोघांना अटक केली. या आरोपींनी जुना मोंढा भागात ता. चार ऑक्टोंबर रोजी दिवसाढवळ्या पिस्तुलाचा धाक दाखवत गोळीबार केला होता. यावेळी रंजीतसिंह मार्केटमधील विजयलक्ष्मी टेक्स्टाईल या दुकानांमध्ये बसून दुकान मालकास मारहाण करुन दहा हजार रुपये जबरीने पळविले होते. तसेच नरसिंह कलेक्शन, शुभम कलेक्शन, कृष्णा कलेक्शन या दुकानासमोर गोळीबार करुन परिसरात दहशत पसरली होती. यावेळी त्यांनी केलेल्या गोळीबारात पानपट्टी चालक आकाशसिंह परिहार हा जखमी झाला होता. त्याच रात्री पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी सर्च ऑपरेशन राबून चार जणांना अटक केली होती.

येथे क्लिक कराउद्यापासून शरद पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर, नुकसानीची करणार पाहणी -

पथकात यांचा होता समावेश 

त्यातील दोघेजण फरार झाले होते. काचीगुडा हैदराबाद येथे हे दोन्ही आरोपी लपून बसल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग भारती, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अब्दुल रब, पोलीस नाईक शंकर म्हैसनवाड, तानाजी यळगे, मोतीराम पवार आणि श्री बडगु यांनी सापळा लावून शुक्रवारी (ता. १६) रात्री या दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध इतवारा पोलिस ठाण्यात खंडणी, जबरी चोरी, भारतीय हत्यार कायदा प्रतिबंध आणि लिंबगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडासह भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही आरोपींना आज शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत पाठवले आहे.