
सिमेंट, स्टील आदींबाबत साठेबाजी आणि कृत्रिम भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सिमेंट नियंत्रण प्राधिकरणाची निर्मिती करावी तसेच सिमेंट दरवाढीची उच्चस्तरीय चौकशी करून योग्य ती कारवाई करावी या व इतर मागण्यांसाठी शुक्रवारी (ता. १२) कुंभारगाव येथे काम बंद आणि धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बिल्डर्स असोसिएशनसह क्रेडाई, महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशन, मजूर फेडरेशन आदी संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य सहभागी झाले होते.
नांदेड - बिल्डर्स असोसिएशऩ आॅफ इंडिया आणि इतर संस्थांच्या वतीने सिमेंट आणि स्टील कंपन्यांच्या मनमानीपणामुळे आणि अनैसर्गिक वाढीच्या विरोधात निषेध करत शुक्रवारी (ता. १२) कुंभारगाव येथे काम बंद आणि धरणे आंदोलन केले. त्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
सिमेंट, स्टील आदींबाबत साठेबाजी आणि कृत्रिम भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सिमेंट नियंत्रण प्राधिकरणाची निर्मिती करावी तसेच सिमेंट दरवाढीची उच्चस्तरीय चौकशी करून योग्य ती कारवाई करावी या व इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बिल्डर्स असोसिएशनसह क्रेडाई, महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशन, मजूर फेडरेशन आदी संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य सहभागी झाले होते.
हेही वाचा - विशेष बातमी : ज्योतिर्लिंग औंढा नागनाथची अशी आहे महती; बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे स्थान, वाचा सविस्तर
दरवाढीचा सर्वात जास्त फटका कंत्राटदारांना
१९४१ साली स्थापन झालेली बिल्डर्स असोसिएशऩ आॅफ इंडिया ही भारतभर इंजिनिअरींग कॉन्ट्रॅक्टर व रियल इस्टेट क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांची संस्था आहे. देश उन्नतीसाठी बांधकाम क्षेत्र अग्रेसर ठेवणे, हेच या संस्थेचे उदिष्ट आहे. बांधकाम क्षेत्रावर चारशेपेक्षा जास्त संलग्न व्यवसाय संस्था यावर अवलंबून आहेत. देशातील बांधकाम व्यावसायिकांना या स्थलांतरित लोकसंख्येसाठी घरे पुरविणे, ही एक मोठी संधी नजीकच्या काळात निर्माण झाली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सिमेंट आणि स्टीलच्या दरात होणारी वाढ लक्षात घेणे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. कंत्राटदारांनी निविदा भरताना ज्या दराने निविदा भरली आहे त्याच दराने त्यांना काम पूर्ण करावे लागत आहे. म्हणून या दरवाढीचा सर्वात जास्त फटका कंत्राटदारांना बसला आहे. दरवाढीचा सर्वात जास्त फटका कंत्राटदार आणि बिल्डर्स यांना होत आहे. त्याचबरोबर दरवाढीमुळे सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरे ही देखील केवळ एक संकल्पनाच राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचलेच पाहिजे - जाणून घ्या: सीमावर्ती देगलूर परिसरात मराठी माणसं बोलतात इतक्या भाषा
हे झाले होते सहभागी
यावेळी बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाबूराव शक्करवार आणि नांदेड सेंटरचे चेअरमन माणिकराव हेंद्रे पाटील, क्रेडाईचे नांदेडचे अध्यक्ष गंगाप्रसाद तोष्णीवाल, महाराष्ट्र इंजिनिअर्सचे जिल्हाध्यक्ष दिलीप बाळसकर, उपाध्यक्ष प्रविण जाधव, बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष नरेश पैंजणे, मनोज मोरे, सचिव सुनील जोशी, मजूर फेडरेशनचे चेअरमन लक्ष्मीकांत गोणे, संचालक मुकुंद जवळगावकर, गजाजन पांडागळे, रामराव ढगे, दीपकसिंग फौजी, संदीप पटणे, एम. ए. हाकीम, साईनाथ पदमवार, अविनाश रावळकर, सय्यद रहिम, मामडेवार, कलंत्री आदी उपस्थित होते.