esakal | सावधान : नांदेडमध्ये कोरोनाचे अर्धशतक पूर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

प्रशासनाकडून नागरिकांना सावध व घरातच राहण्याचा सल्ला दिल्या जात आहे. मात्र नांदेडकर ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने आता तर चक्क मुख्य रस्त्यावरील बॅरीकेटस काढून रस्ते वाहतुकीसाठी खूले केले आहे.

सावधान : नांदेडमध्ये कोरोनाचे अर्धशतक पूर्ण

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : ग्रीन झोनमध्ये आसलेले नांदेड शहर हे रेड झोनच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. दररोज पाच ते सात अशी रुग्ण संख्या वाढत असल्याने नांदेडकरांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. रविवारी (ता. १०) कोरोना बाधीत रुग्णसंख्या ही अर्धशतकाच्या पुढे गेली आहे.

प्रशासनाकडून नागरिकांना सावध व घरातच राहण्याचा सल्ला दिल्या जात आहे. मात्र नांदेडकर ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने आता तर चक्क मुख्य रस्त्यावरील बॅरीकेटस काढून रस्ते वाहतुकीसाठी खूले केले आहे. अशा परिस्थितीत गर्दीला पांगविण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाले आहे. 

पहिल्या टप्यात नांदेडमध्ये एकही कोरोना नव्हता

संबंध जगभरात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू आहे. भारतातही तिसरे लॉकडाउन जाऊन करुन ते अंतीम टप्यावर आले आहे. पहिल्या टप्यात नांदेडमध्ये एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. त्यानंतर पिरबुऱ्हाननगरभागात एका ६४ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली. मात्र त्याची दुसरी तपासणी निगेटीव्ह आली. परंतु त्या वृद्धाचा मृत्यू झाला. त्यानंतर पंजाब राज्यातून आलेल्या चार चालकांना कोरोना झाल्याचे तपासणीत सिध्द झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. मात्र पिरबुऱ्हाननगर भागातील मयत रुग्णाला कोरोना कसा झाला, त्याची माहिती अद्याप प्रशासनाला देता आली नाही. आजही भाग कन्टेनमेन्ट झोन आहे.  

हेही वाचा Nanded Breaking : आज पुन्हा सहा पॉझिटिव्ह, संख्या गेली ५१ वर

‘ते’ दोन कोरोना बाधीत रुग्ण अद्याप बेपत्ताच

त्यानंतर लंगरसाहिब गुरूद्वारामधील २० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यातीत दोघेजण अद्याप बेपत्ता आहेत. येथील कर्मचाऱ्यांचा स्वॅब घएणे सुरू असतानाच रहेमतनगर भागातील एका वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तिच्या संपर्कातील चारजणांना लागन झाल्याचे पहिल्या अहवालात निष्पन्न झाले. त्या महिलेच्या मृत्यूनंतर मात्र प्रशासन खडबडुन जागे झाले. 

रुग्ण संख्या अर्ध शतकापुढे

देवसेंदिवस रुग्ण संख्या घटण्यापेक्षा वाढतच गेली. शनिवारी आणि रविवारी या दोन दिवसात तब्बल तेरा रुग्णांची भर पडली. रविवारी (ता. १०) सायंकाळी पाचवाजेपर्यंत बाधीत रुग्णांची संख्या ही ५१ झाली. त्यात पाच जणांना मृत्यू झाला. तर दोघे जण बेपत्ता असून उर्वरीत रुग्णावर विष्णुपूरी येथील शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालयात व प्रकाश भवन, यात्रीनिवास येथे उपचार सुरू आहेत. 

येथे क्लिक करा -  कन्टेनमेंट झोनमध्ये नियम पाळा, बंदी उठविण्यात येईल- डॉ. विपीन

प्रशासनाकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन

शहरातील पिरबूऱ्हाननगर, अबचलनगर, लंगरसाहिब, गुरुद्वारा परिसर, अंबानगर सांगवी, रहेमतनगर आणि करबला रोड हा परिसर कन्टेनमेन्ट क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत. शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्यासह आदी नागरिकांना धीर देत घरातून कामाशिवाय बाहेर पडु नका असे आवाहन करत आहेत.