केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सहकारी संस्था, साखर कारखाने आर्थिक अडचणीत- अशोक चव्हाण

लक्ष्मीकांत मुळे
Thursday, 29 October 2020

कारखाना कठीण परिस्थिती मध्ये भाऊरावने शेतकरी व कामगारांचे देने चुकते केले आहे.आशी परिस्थिती गेल्या चोवीस वर्षात कधीच आली नव्हती. शेतकरी हितासाठी कारखाने चालविली आहेत आसे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री  अशोक चव्हाण यांनी भाऊरावच्या रौप्यमहोत्सवी गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी गुरूवारी (ता 29) केले

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सहकारी संस्था,साखर कारखाने अर्थिक आडचणीत आले आहेत.गेल्या तीन वर्षापासून साखरेचा भाव निश्चित करण्यासाठी पाठपुरावा केल्याने साखरेचा भाव निश्चित करण्यात आला आहे.केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कारखाने विकावे लागले आहेत. कारखाना कठीण परिस्थिती मध्ये भाऊरावने शेतकरी व कामगारांचे देने चुकते केले आहे.आशी परिस्थिती गेल्या चोवीस वर्षात कधीच आली नव्हती. शेतकरी हितासाठी कारखाने चालविली आहेत आसे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी भाऊरावच्या रौप्यमहोत्सवी गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी गुरूवारी (ता 29) केले.

यावेळी मार्गदर्शन करतांना श्री चव्हाण पुढे म्हणाले की, परतीच्या पावसामुळे खुप मोठे नुकसान झाले आहे.यासाठी राज्यशासानाने दहा हजार कोटीचे पॅकेज घोषित केले असून त्यापैकी आडीच हजार कोटी सार्वजनिक बांधकाम विभाला मिळणार आहेत.यात मराठवाड्याला साडेपाचशे कोटी मिळणार आहेत.या निधीतून तुटलेले  रस्ते , पुलं तयार करण्यात येणार आहेत. डाॅ विश्वजित कदम यांचे काम चांगले असून त्यांचे लवकरच प्रमोशन होईल.केळीच्या पिक विम्याचा चौकशी आहवाल मंत्रालयात पाठविण्यात आला असून याकडे लक्ष देण्यत यावे अशी सुचना श्री चव्हाण यांनी केली.अर्धापूरच्या वळण रस्त्यप्रमाणे रेल्वेच्या भूसंपादनासाठी चौपट मावेजा मिळण्यासाठी केंद्राला पत्र पाठविण्यात आले आहे आशी माहिती श्री चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा -  साहित्य परिषदेतर्फे साहित्यिक प्राचार्य ग.पी. मनूरकर यांना आदरांजली -

यांची होती उपस्थिती

यावेळी व्यासपीठावर राज्यमंत्री डाॅ विश्वजित कदम, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार आमरनाथ राजुरकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, जिल्हा परिषद आध्यक्षा मंगाराणी आंबुलगेकर, महापौर मोहिनी यवनकर; सभापती कांताबाई सावंत, गोविंदराव शिंदे, संजय देशमुख लहानकर, पप्पु पाटील कोंढेकर, उपमहोपौर मसुदखान, सभापती बाबासाहेब पाटील आदी उपस्थित होते. कारखाना प्रशासनाच्या वतीने संचालकांनी उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.

रौप्यमहोत्सवी गळती हंगामाचा शुभारंभ गव्हाणीत मोळी टाकून

रौप्यमहोत्सवी गळती हंगामाचा शुभारंभ गव्हाणीत मोळी टाकून करन्यात आला.यानंतर कारखाना परिसरातील मैदानावर एका छोट्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.कारखान्याचे आध्यक्ष गणपतराव तिडके यांनी प्रास्ताविक करून कारखान्याचा विकासाचा आढावा सादर केला.

परितीच्या पावसाने खूप मोठे नुकसान झाले

यावेळी मार्गदर्शन करतांना राज्यमंत्री डाॅ विश्वजित कदम म्हणाले की, मराठवाड्यातील शेती ओलितााली आन्यासाठी धरने बांधून शेती हिरवीगार केली.त्यांचाच विकास कामांचा वारसा अशोक चव्हाण यांनी पुढे नेत आहेत. मराठवाड्यात साखर कारखाना यशस्वी चालून शेतक-याना खूप मोठा दिलासा दीला आहे. त्यांच्यावर आघात झाले पण त्यातुन ते बाहेर पडले आहेत. शेतक-यांना कर्जमाफी देवून खूप आधार दिला आहे.तसेच परितीच्या पावसाने खूप मोठे नुकसान झाले आहे. शेतक-यांना लवकरच मदत देण्यात येईल. केंद्र सरकार राज्यतील सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचे काम करित आहे आशी टिका केली. तसेच अशोक चव्हाण यांच्यामुळेच युवक काॅग्रेसचा आध्यक्षपद मिळाले आसे आर्वजून सांगितले.

येथे क्लिक करानिकालाचे अकडे पाहून विकास आराखडा आखत नाही- आमदार भीमराव केराम -

शेतकरी, सभासद उपस्थित होते

उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे उपाध्यक्ष प्रा कैलास दाड, संचालक रंगराव इंगोले, रामराव कदम, मोतीराम जगताप, प्रवीण देशमुख, व्यंकटराव कल्याणकर, अॅड सुभाष देशमुख, आनंद सावते, सुभाषराव देशमुख, दत्ताराव आवातिरक,.बालाजी शिंदे, माधवराव शिंदे,रामराव पवार, शिवाजी पवार, किशनराव पवार, अशोक कदम, भिमराव कल्याणे, साहेबराव राठोड, यांनी स्वागत केले. तर यावेळी केशवराव इंगोले, भगवान तिडके, कार्यकारी संचालक श्याम पाटील, जनसंपर्क अधिकारी शिवाजीराव धर्माधिकारी, संजय भोसले, बालाजी गव्हाने,राजु शेटे, डाॅ विशाल लंगडे, शेख लायक, मुसबीर खतीब,नासेर खान पठान, उमेश सरोदे, रंगनाथ इंगोले, दिगांबर पाटील,  संजय लोणे, मारोतराव गव्हाणे ,श्यामराव पाटील टेकाळे, अशोक सावंत, चंद्रमुणी लोणे, कामाजी आटकोरे ,छत्रपती कानोडे, व्यंकटी सारखे आदी शेतकरी, सभासद उपस्थित होते.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Co-operative societies, sugar factories in financial difficulties due to wrong policy of Central Government Ashok Chavan nanded news