नांदेड : उमेदवारांच्या प्रचाराने भरले ‘यिन’च्या निवडणुकीत रंग

नांदेड जिल्ह्यातील सहा महाविद्यालयांत निवडणूक : ३० नोव्हेंबरला ऑनलाइन मतदान
नांदेड जिल्ह्यातील सहा महाविद्यालयांत निवडणूक : ३० नोव्हेंबरला ऑनलाइन मतदान
नांदेड जिल्ह्यातील सहा महाविद्यालयांत निवडणूक : ३० नोव्हेंबरला ऑनलाइन मतदान sakal

नांदेड : यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)च्या निवडणुकीची सर्वत्र लगबग दिसत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ‘यिन’च्या निवडणुकीत उमेदवारांकडून रंग भरावयास सुरुवात झाली आहे. औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, नांदेड जिल्ह्यात ३० नोव्हेंबर रोजी ऑनलाइन मतदान पार पडणार आहे. ‘यिन’तर्फे संपूर्ण राज्यात होत असलेल्या निवडणुकीकडे तरुणाईचे लक्ष लागले आहे. महाविद्यालयीन अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी होत असलेल्या निवडणुकीचा उमेदवारांनी प्रचार सुरू केला असून विजयी करण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील सहा महाविद्यालयांत पहिल्या टप्प्यात मतदान होणार असून प्रत्येक महाविद्यालयातून चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या शर्यतीत पुढे राहण्यासाठी प्रत्येकजण जोरदार प्रचार करून विद्यार्थी मतदारांना आकर्षित करीत आहेत.

नांदेड जिल्ह्यातील सहा महाविद्यालयांत निवडणूक : ३० नोव्हेंबरला ऑनलाइन मतदान
Corona Update : राज्यात 889 नवीन रुग्ण तर 17 रुग्णांचा मृत्यू

या महाविद्यालयात पहिल्या टप्प्याचे मतदान

  • पीपल्स महाविद्यालय, नांदेड

  • जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, सिडको, नांदेड.

  • एन. एस. बी. महाविद्यालय, नांदेड.

  • मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वाडीपाटी, नांदेड.

  • वसंतराव नाईक कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, नेहरूनगर.

  • कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, शंकरनगर, ता. बिलोली.

  • एम. जी. एम. कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड अायटी महािवद्यालय.

"यिनची निवडणूक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सर्वाधिक महत्त्वाचा टप्पा असून यिनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्याची वाटचालीस आणि भविष्यातील ध्येय गाठण्यासाठी मोलाची साथ मिळत आहे."

- प्रा.डॉ. एस. व्ही. शिवणीकर, एन. एस. बी. महाविद्यालय, नांदेड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com