file photo
file photo

अकरा लाख क्विंटल कापसाची खरेदी.....कुठे ते वाचा

नांदेड : जिल्ह्यात आतापर्यंत पन्नास हजार शेतकऱ्यांचा ११ लाख १९ हजार १०७ क्‍विंटल कापूस खरेदी झाला आहे. यात सर्वाधीक केंद्रीय कपास निगमने (सीसीआय) सव्वाचार लाख, खासगी व्यापाऱ्यांनी चार लाख तर कापूस पणन महामंडळाने एक लाख ८४ हजार क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. अद्यापही नांदेड केलेल्यापैकी २६ हजार ५७३ शेतकऱ्यांचा कापूस शिल्लक असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली. 

५१ हजार शेतकऱ्यांचाा ११ लाख क्‍विंटल कापूस विक्री
जिल्‍ह्यात खासगी बाजारात कपाशीचा दर पडल्यानंतर केंद्र शासनाच्या किमान हमी दरानुसार नऊ ठिकाणी कापूस खरेदी सुरु करण्यात आली. यात ‘एफएक्यू’ दर्जाचा कापूस पाच हजार ३५० ते पाच हजार ४५० रुपये क्विंटल प्रमाणे खरेदी करण्यात येतो. हा कापूस पणन महासंघ तीन ठिकाणी, सीसीआय सहा ठिकाणी तर खासगी बाजार, थेट पणन परवानाधारक व बाजार समितीमधील अनुज्ञप्तीधारक व्यापाऱ्यांनी बुधवारपर्यंत (ता.१०) ५१ हजार २२२ शेतकऱ्यांनी ११ लाख १९ हजार १०७ क्‍विंटल कापूस विक्री केला आहे. 

कोरोनापूर्वी ९२ हजार ६८९ क्‍विंटल कापूस खरेदी
कोरोना विषाणूच्या उपाययोजनेतंर्गत लागू केलेल्या लॉकडाउनच्या काळात बंद असलेली खरेदी लॉकडाउन शिथील केल्यानंतर सुरु झाली. कोरोनाचा फैलाव होण्याअगोदर कापूस पणन महासंघाकडे सहा हजार २४६ शेतकऱ्यांचा ९२ हजार ६८९ क्‍विंटल कापूस विक्री झाला. सीसीआयकडे १४ हजार ७८ शेतकऱ्यानी तीन लाख २४ हजार ३९ क्‍विंटल, खासगी बाजारात १४ हजार १४० शेतकऱ्यांनी तीन लाख ५२ हजार ९० क्‍विंटल कापसाची विक्री केली. तर थेट पणन परवानाधारकांनी ९२१ शेतकऱ्यांचा आठ हजार ४२३ क्विंटल व बाजार समितीमधील परवानाधारक व्यापाऱ्यांनी चार हजार ४८८ शेतकऱ्यांचा ८४ हजार दहा क्विंटल कापसाची खरेदी केली. या काळात जिल्ह्यात ३९ हजार ८७३ शेतकऱ्यांचा आठ लाख ६१ हजार २५२ क्विंटल कापूस खरेदी झाला आहे.

लॉकडाउननंतर सव्वादोन लाख क्विंटल खरेदी
लॉकडाउन शिथील झाल्यानंतर जिल्ह्यातील कापूस उत्पादनकांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यानुसार नोंदणी केलेल्या ५१ हजार २२२ शेतकऱ्यांपैकी ११ हजार ३४९ शेतकऱ्यांचा दोन लाख वीस हजार ७१२ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. यात कापूस पणन महासंघाकडून दोन हजार ३६० शेतकऱ्यांचा ५४ हजार ९१३ क्विंटल, सीसीआयकडे पाच हजार ३८० शेतकऱ्यांचा १ लाख ४ हजार ८४३ क्‍विंटल, खासगी बाजारात दोन हजार २३६ शेतकऱ्यांचा ४४ हजार ५९२ क्‍विंटल कापसाची खरेदी झाली. तर बाजार समितीमधील परवानाधारक व्यापाऱ्यांनी एक हजार ३७३ शेतकऱ्यांचा १६ हजार ३६३ क्विंटल खरेदी झाली.  

शिल्लक कापसाचा सर्वे सुरु
जिल्ह्यात नोंदणी झालेल्या बहुतांश शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आला आहे. सध्या २६ हजार शेतकरी शिल्‍लक असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, जिल्ह्यात आखणी शेतकऱ्यांकडे घरात कापूस पडून आहे. केवळ नोंदणी करता आली नसल्याने अशा शेतकऱ्यांना कापूस विक्री करता आला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा कापूस विक्रीसाठी नोंदणी सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे. दरम्यान महसूल विभागाकडूनही शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांच्या कापसाचा सर्वे करण्याचे काम सुरु आहे. यामुळे नेमके किती शेतकरी विक्री विना शिल्लक राहिल्याची माहिती मिळेल, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com