नांदेडच्या उद्योगिनी महिला समूहातर्फे मसाला निर्मिती उद्योग

Nanded News
Nanded News

नांदेड : मागील सात महिन्यांपासून अनेक महिला व पुरुष बेरोजगारीचा सामना करीत आहेत. दैनंदिन मुजुरी करणाऱ्या, घरकाम करणाऱ्या, कमी वेतनावर आस्थापनात काम करणाऱ्या अनेक महिला आज रोजगारापासून वंचित आहेत. लॉकडाउनमुळे रोजगार बुडाल्यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या कुटुंबासमोर रोजचा उदर्निवाह हाच प्रश्न जास्त गंभीर असल्यामुळे महिलांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत.

उद्योगिनी व्यासपीठ महिलांसाठी आधारवड
महिलांना नवनवीन उद्योग व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देऊन महिलांच्या अद्योगक्षम क्षमता वाढविण्याचे कार्य करीत असलेले उद्योगिनी व्यासपीठ हे महिलांसाठी एक आधारवड म्हणून कार्य करीत आहे. लॉकडाउन काळात देखील मास्क आणि पिशवी निर्मितीच्या माध्यमातून ५० पेक्षा जास्त महिलांना आर्थिक उत्पन्न उपलब्ध करून देणाऱ्या उद्योगिनी समूहातर्फे आता मसाला निर्मिती उद्योगाला सुरुवात केली आहे. 

नऊ मसाल्यांचे उत्पादन
इन्स्टंट मिक्स करी मसाला, कांदा लसूण मसाला, काळा मसाला, पाव भाजी मसाला, चाट मसाला, मटण मसाला, बिर्याणी मसाला, किचन किंग मसाला आणि सेलूचे चणा मसाला अशा दर्जेदार आणि स्वादिष्ट नऊ मसाल्यांचे उत्पादन उद्योगिनी समूहातर्फे केले जात आहे. याचा प्रीलाँच कार्यक्रम सर्व उद्योगिनींच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. कुठलेही तेल, तिखट, मीठ, कांदा, लसूण असे साहित्य न वापरता फक्त एक मसाल्याच्या उपयोगाने अनेक खमंग खाद्यपदार्थ बनवता येत असल्याचा इन्स्टंट मिक्स करी मसाला हा अल्पावधीत लोकप्रिय होऊ लागला आहे.

या आहेत उद्योगिनी
निकिता पांडे, स्वाती देशपांडे (समन्वयक), वत्सला मोरे, सुवर्णा कुलकर्णी, चित्रा उन्हाळे, मीना पांडे, पल्लवी जैन, संपूर्ण कंचलवर, शुभांगी नरवाडे, विना नांदेडकर, सुनीता गाढे, मीना पवार, रोहिणी वाघमारे, श्रुती मंदाडे, सरोज दाभाडे, रुपाली पवितवार, शैला वसमतकर, विनय कुलकर्णी, चैतन्या शेकापुरे, विद्या तातूस्कर, शिवानी देशमुख, अर्पिता मेकलवार, सरीला रेवनवार, रंजना येमेवार, रेखा स्वामी, शीतल देशमुख, रुपाली पावडे, गौरी पावडे, भाग्यश्री वैद्य, स्वाती वैद्य, शीतल वैद्य, सविता पावडे, गंगासागर वैद्य, अनुसया पुळकुटावर, सरोजा दाभाडे, मुक्ता जंगले, रंजना येमेवार, अर्पिता मेकलवार आदी.

महिलांना सक्षम बनविण्यासाठीचा प्रयत्न
कोरोना महामारीमुळे विस्कटलेल्या कुटुंबाला आधार मिळावा, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवावे या उद्देशाने ‘उद्योगिनी समुहा’तर्फे मसाला निर्मिती उद्योगाला सुरुवात केली आहे. 
- किरण चौधरी, अध्यक्ष (शुभंकरोती फाऊंडेशन, नांदेड) 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com