esakal | पुणे शहरात 187 तर जिल्ह्यात 826 नवे रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

pune corona

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यामध्ये नव्या रुग्णसंख्येत मोठी घट बघायला मिळत आहे. सोमवारी दिवसभरात पुणे जिल्ह्यात 826 नवीन रुग्ण आढळले.

पुणे शहरात 187 तर जिल्ह्यात 826 नवे रुग्ण

sakal_logo
By
सूरज यादव

पुणे - कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यामध्ये नव्या रुग्णसंख्येत मोठी घट बघायला मिळत आहे. सोमवारी दिवसभरात पुणे जिल्ह्यात 826 नवीन रुग्ण आढळले. तर यापैकी पुणे शहरात फक्त 187 तर पिंपरी चिंचवडमध्ये 158 नव्या रुग्णांची नोंद झाली. ग्रामीण भागात 481 नवीन रुग्ण आढळले. विशेष म्हणजे नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दुपटीपेक्षा जास्त आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात एकूण 1930 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 10 लाख 32 हजार 917 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 10 लाख 3 हजार 992 जण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 17 हजार 454 जणांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या 11 हजार 471 इतकी आहे. यापैकी 7 हजार 77 जण रुग्णालयात तर 4 हजार 394 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

हेही वाचा: नऊ महिन्यांत ३३ गुन्हेगारी टोळ्यांवर 'मोका' ची कारवाई

पुणे शहरात सोमवारी 187 नवीन रुग्ण आढळले. तर 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत शहरामध्ये 4 लाख 74 हजार 299 जणांना कोरोनाची लागण झाली. तर 4 लाख 62 हजार 929 जण बरे झाले. शहरात कोरोनामुळे आजपर्यंत 8 हजार 482 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये दिवसभरात 158 नवीन रुग्णांची नोदं झाली. कोरोनामुले 3 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात एकूण 15 जणांना कोरोनामुले प्राण गमवावे लागले.

राज्यात दिवसभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट पहायला मिळाली. त्यानुसार, आज ८,१२९ रुग्ण आढळून आले. तर १४,७३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आता १,४७,३५४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

loading image
go to top