एसटीने घरी जायचे का? इथे करा संपर्क...

File Photo
File Photo

नांदेड: देशात ‘कोरोना’चा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने (ता.२२) मार्चच्या मध्यरात्रीपासून लॉकडाउन जारी केले आहे. अचानक झालेल्या लॉकडाउनच्या घोषणेमुळे देशाच्या विविध भागात कामानिमित्त गेलेले नोकरदार, विद्यार्थी व कामासाठी घर सोडुन पुणे, मुंबई, नासिक, औरंगाबाद अशा शहरात मागील दीड महिण्यापासून अडकुन पडले होते.

लॉकडाउनच्या घोषणेला आज ४३ दिवस पूर्ण झाले आहेत. त्यामुळे इतर ठिकाणी अडकुन पडलेल्या विद्यार्थ्यांच्या जेवणाची व राहण्यासाठी हाल-अपेष्टा होत आहेत. त्यांना घरच्यांची काळजी वाटत आहे. राज्य शासनाने त्या अडकुन पडलेल्यांची घरी जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची तात्पूर्ती बस सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळास सूचना करून विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी परवानगी दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांना घरी जायचे आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी परिवहन महामंडळाच्या नांदेड विभागाने जिल्ह्यातील ११बस डेपोत वाहतूक सुविधा नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. नांदेडासाठी हा दूरध्वनी क्रमांक ०२४६२-२६०६२१ हा संपर्क क्रमांक दिला असून, याशिवाय नांदेड विभागातील प्रत्येक आगारातील वाहतूक नियंत्रण कक्षात क्रमांक स्थापन केला आहे.

या जिल्ह्यातील प्रवाशांना जाता येणार घरी

यादरम्यान विद्यार्थी, कामगारांना नांदेड विभागातून मुंबई, पुणे, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, धुळे, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, अमरावती, जालना, अकोला, बुलढाणा, नागपूर, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात जाण्यासाठी एसटी महामंडळाने बसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 
मात्र, यासाठी विद्यार्थ्यांना किंवा कामगारांना घरी जाण्यापूर्वी त्या - त्या ठिकाणच्या जिल्हा शल्यचिकित्सक अथवा आरोग्य अधिकारी यांचे मेडिकल सर्टिफिकेट घेणे बंधनकारक आहे.

प्रवासात मास्क अनिवार्य

एका बसमध्ये किमान २१ ते २२ प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे. त्यासाठी त्या प्रवाशांनी समांतर अंतर राखुन प्रक्रिया पूर्ण करत किमान २१ विद्यार्थ्यांनी नांदेड विभागातील ११ पैकी कुठल्याही बस डेपोतील अधिकारी यांच्याशी संपर्क साधल्यास त्यांना इच्छित स्थळी सोडण्यात येणार आहे. प्रवासा दरम्यान त्यांना मास्क घालुन प्रवास करावा लागणार, बसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सॅनिटायझरने हात धुणे बंधनकारक असणार आहे. नांदेडच्या विभागातून निघालेली महामंडळाची बस प्रवासादरम्यान ठरवून दिलेल्या ठिकाणापूर्वी इतर कुठे थांबणार नाही. किंवा कुठल्याही प्रवाशांना बसमध्ये घेणार नाही. गाडीमध्ये एका सिटवर एकाच व्यक्तीस बसविण्यात येणार आहे. 

इथे साधा संपर्क-

अधिकार यांचे नाव- पद- भ्रमणध्वनी- कार्यालयीन संपर्क क्रमांक
१- अविनाश कचरे- विभागीय नियंत्रक - ८२७५०३८४१७ - ०२४६२ २६०१७५
२- सं. बा. साळवे - विभागीय वाहतूक अदिकारी - ९४२२१८५६१९ - ०२४६२२६०६२१
३- पु. त. व्यवहारे - आगार प्रमुख (वरिष्ठ नांदेड) - ८३९०१६८६१३
४-सु. धु. पवार - आगार प्रमुख (भोकर) - ८३९०१६८६१३ - ०२४६७ २०२६३३
५- मी. पु. सोनाळे -किनवट'- ९८८१३९१९५८ - ०२४६९ २२२०५०
६- सं. तु. शिंदे - मुखेड - ९३०७७८६०८३ - ०२४६१ २०२५४७
७- अ. रा. चव्हाण - देगलूर - ७५८८५२३७८२ - ९४२२८७८४४१७
८- ह. म. ठाकुर - कंधार - ९८२३५३३८९० - ०२४६६ २२३४३५
९- सं बा. अकुलवार - हदगाव- ९४२०४६१७११ - ०२४६८ २२२३४४
१०-च. र. समर्थवाड - बिलोली - ८६९८०९४५६५ - ०२४६५ २२३३२३
११- वि. तु. धुतमल - माहुर - ८६६८४८२५०४ - ०२४६० २६८४२४

४४ रुपये पर किलोमीटर प्रमाणे भाडे

लॉकडाउनमध्ये अडकुन पडलेल्या प्रवाशांकरीता राज्यशासनाकडून महामंडळास प्रवाशांना सोडण्याची मुभा मिळाली आहे. यासाठी महामंडळ त्यांच्याकडून ५६ रुपये किलोमीटर ऐवजी ४४ रुपये पर किलोमीटर प्रमाणे भाडे आकारण्यात येणार आहे. शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करुनच ही बस मार्गस्थ होणार आहे.
- अविनाश कचरे, विभागीय नियंत्रक, नांदेड.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com