esakal | कोरोना ब्रेकींग : नांदेडला पुन्हा जबर धक्का, १८ रुग्णांची भर, संख्या २८० वर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नांदेड जिल्ह्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासनाचीही चांगलीच धांदल उडत आहे. आज आलेल्या अहवालामध्ये बाधीत झालेल्या बँक अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांचा सर्वाधीक समावेश आहे. 

कोरोना ब्रेकींग : नांदेडला पुन्हा जबर धक्का, १८ रुग्णांची भर, संख्या २८० वर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नांदेडकरांना मंगळवारी (ता. १६) पुन्हा जबर धक्का बसला असून कोरोना पॉझिटिव्हचे १८ रुग्ण सापडले आहे. त्यामुळे जिल्‍ह्याची संख्या आता २८० वर पोहचली आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे नांदेड जिल्ह्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासनाचीही चांगलीच धांदल उडत आहे. आज आलेल्या अहवालामध्ये बाधीत झालेल्या बँक अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांचा सर्वाधीक समावेश आहे. 

रविवारी व सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालापैकी काही व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले होते. चार अहवालांचा निष्कर्ष अनिर्णीत आहे. सद्यस्थितीत ८४ बाधित व्यक्तींवर औषधोपचार चालू असून त्यातील तिन बाधितांमध्ये ५२ वर्षाची एक महिला आणि ५२ व ५४ वर्षाचे दोन पुरुषांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या एकुण १३ आहे.

 हेही वाचा २०० खाटांचे केअर सेंटर लवकरच सुरू होणार

अनेकांचा अहवाल प्राप्त होणार 

नांदेड जिल्ह्यात ८४ बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे २५, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ४७, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे सहा बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल असून पाच बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. 

जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.

सर्वेक्षण- एक लाख ४८ हजार ५१,
घेतलेले स्वॅब पाच हजार १९,
निगेटिव्ह स्वॅब चार हजार ३४७,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या-१८
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती २८०
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या १९१,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या ८३,
मृत्यू संख्या १३,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या १८६
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती ८४

येथे क्लिक करा - अक्षदा पडण्याअगोदर नवदाम्पत्यानी याला दिले महत्व

जनतेने सहकार्य करावे

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. निळकंठ भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.