esakal | कोरोना - जिल्ह्याची २५ हजाराकडे वाटचाल सुरु, गुरुवारी १२५ अहवाल पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे बुधवारी (ता. तीन) स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. गुरुवारी (ता. चार) एक हजार ७९९ स्वॅब अहवाल प्राप्त झाले आहेत.

कोरोना - जिल्ह्याची २५ हजाराकडे वाटचाल सुरु, गुरुवारी १२५ अहवाल पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेडः जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे आकडे दिवसेंदिवस वाढतच आहेत. गुरुवारी (ता. २५) प्राप्त झालेल्या अहवालाने तर चक्क सव्वाशेचा आकडा पार केल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. एकाच वेळी शतकीपार रुग्णांची वाढ होणे, हे दुसऱ्या लाटेचे लक्षण असल्याने जिल्हा प्रशासनाला देखील कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करावी लागणार आहे. 

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे बुधवारी (ता. तीन) स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. गुरुवारी (ता. चार) एक हजार ७९९ स्वॅब अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये एक हजार ६५८ अहवाल निगेटिव्ह तर १२५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २४ हजार ३१ इतकी झाली आहे. 

हेही वाचा- धक्कादायक: अर्धापुरात राष्ट्रीय महामार्गसाठी संपादित केलेल्या जमीनीचाा मावेजा न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

मृत्यू  संख्या ६०३ वर

गुरुवारी श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या किनवड मधील अप्पाराव पेठेतील पुरुष (वय ६५) यांचे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ६०३ इतकी झाली आहे. 
गुरुवारी नांदेड महापालिका क्षेत्रात - ८१, नांदेड ग्रामीण - सहा, किनवट - एक, लोहा - दहा, देगलूर - सहा, भोकर - एक, धर्माबाद - चार, माहूर - तीन, उमरी - एक, मुखेड - चार, यवतमाळ - दोन, हिंगोली - पाच, नागपूर - एक असे १२५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

हेही वाचा- नांदेडच्या शिक्षकास १४ लाखापायी पावणेदोन लाखाचा आॅनलाईन गंडा; गुन्हा दाखल

नांदेड कोरोना मीटर 

एकूण पॉझिटिव्ह - २४ हजार ३० 
एकूण बरे - २२ हजार ५१६ 
एकूण मृत्यू - ६०३ 
गुरुवारी पॉझिटिव्ह - १२५ 
गुरुवारी बरे - ८१ 
गुरुवारी मृत्यू - एक 
उपचार सुरु - ६९८ 
गंभीर रुग्ण - १८ 
स्वॅब तपासणी सुरु - २०९ 
 

loading image