esakal | कोरोना इफेक्ट : साथरोग तपासणीत घट केवळ २१ हजार  रुग्णांची तपासणी
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यामुळे यावर्षी आरोग्य यंत्रणेवर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. त्यामुळे अनेक डॉक्टर अधिकारी, आरोग्य कर्मचारी एक दिवस सुट्टी न घेता काम करत आहेत.

कोरोना इफेक्ट : साथरोग तपासणीत घट केवळ २१ हजार  रुग्णांची तपासणी

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड ः  दरवर्षी पावसाळा सुरु होताच ताप, सर्दी, खोकला, डेंग्यू, उलटी, अतिसार, चिकनगुन्या, कावीळ या आजारांच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होते. पावसाळ्यात पसरणारे साथीच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयामार्फत जुलै महिण्यापासून संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी घेतले जातात. परंतू, यंदा रक्तजल तपासणीत निम्मी घट झाल्याचे दिसून आले.
 
कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यामुळे यावर्षी आरोग्य यंत्रणेवर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. त्यामुळे अनेक डॉक्टर अधिकारी, आरोग्य कर्मचारी एक दिवस सुट्टी न घेता काम करत आहेत. त्यातच जिल्हा हिवताप कार्यालयाकडे अतिशय कमी मनुष्यबळाच्या जोरावर जिल्ह्यातील हिवताप आणि डेंग्यू आजार रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु असले तरी यंदा मात्र या विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोना काळात इतर कामे करुन हिवताप आणि डेंग्युची तपासणी करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा स्वतःची काळजी घेत कंन्टेनमेंट झोन वगळून निम्या लोकांपर्यंतच जाता आल्याने तपासणीत घट झाली आहे. 

हेही वाचा - सचखंड गुरुद्वारा बोर्ड : सुप्रीम कोर्टाने देवेंद्र फडणवीसांना फटकारले, औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम​

जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाची कामगिरी

गेल्या वर्षी जुलै २०१९ ला महिणाभरात जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयामार्फत ४२ हजार ५९४ रक्तजल नमुने तपासणीकरिता घेतले होते. यात एकही दूषित रुग्ण आढळुन आला नव्हता. तर जानेवारी ते जुलै या सात महिण्याच्या कालावधीत दोन लाख ३५ हजार ६१९ रक्तजल नमुने तपासणी करण्यात आले होते. यात एक दूषित रुग्ण आढळुन आला आहे. तर जुलै २०२० या एका महिण्यात यंदा केवळ २१ हजार ९६३ रुग्णांच्या रक्तजल तपासणी करण्यात करण्यात आली. यामध्ये एक रुग्ण दूषित आढळुन आला. जानेवारी ते जुलै २०२० या सात महिण्यात एक लाख ७२ हजार ४३२ रक्तजल नमुने तपासण्यात आले होते. यामध्ये दोन रक्तजल नमुने दुषीत आढळुन आले आहेत. 

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात शंभरपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त; ११५ जण पाझिटिव्ह ​

 डेंग्यू ताप आजाराची अवस्था

काहीशी अशीच आहे. जुलै २०१९ या महिण्यामध्ये १४७ इतके रक्तजल नमुने तपासणीकरिता घेण्यात आले होते. यात ३२ रुग्णांचे रक्तजल नमुने दूषित आढळुन आले. तर जानेवारी ते जुलै दरम्यान ५९२ रक्तजल नमुने तपासणी करण्यात आली होती. यात ११६ रुग्णांचे नमुने दूषित आढळु आले होते. परंतू, जुलै २०२० मध्ये कोरोना आजाराचा प्रादूर्भाव वाढल्याने एक महिण्यात केवळ १३ रक्तजल नमुने तपासणीसाठी घेता आले. तर जानेवारी ते जुलै या सात महिण्यात १९५ रुग्णांची तपासणी करण्यात आली यात ७८ रुग्ण डेंग्यु तापीचे रुग्ण आढळ्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आकाश देशमुख यांनी माहिती दिली.  

हिवताप- 

वर्ष/ महिणा जुलै महिण्यात घेतलेले नमुने दूषीत रुग्ण- जाने ते जुलै २०१९ दरम्यान तपासणी आढळलेले दूषीत रुग्ण संख्या

जुलै   -  २०१९
४२ हजार ५९४  शुन्य दोन लाख ३५ हजार ६१९ एक
जुलै-२०२० २१ हजार ९६३ एक  एक लाख ७२ हजार ४३२ दोन

डेंग्युताप

वर्ष/ महिणा जुलै महिण्यात घेतलेले नमुने दूषीत रुग्ण जाने ते जुलै २०१९ दरम्यान तपासणी आढळलेले दूषीत रुग्ण संख्या
जुलै -२०१९      १४७   ३२         ५९२      ११६
जुलै-२०२०       १३   दोन         १९५        ७८ 
loading image
go to top