दोन योद्ध्यांना गाठले कोरोनाने, आरोग्य विभागात खळबळ...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

मुखेड तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण बुधवारी सापडल्यानंतर तीन दिवस उलटत नाहीत, तोच शनिवारी येथील दोन योद्ध्यांनाच कोरोनाने गाठले.

नांदेड : जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण बुधवारी सापडल्यानंतर तीन दिवस उलटत नाहीत, तोच शनिवारी येथील दोन योद्ध्यांनाच कोरोनाने गाठले. सध्या एकअंकी रुग्ण असलेल्या तालुक्यात आरोग्य विभागातील दोघांना लागण झाली ज्यात एका डॉक्टरसह परिचारिकेचा समावेश आहे. त्यामुळे अजून काळजी वाढली आहे.

आत्तापर्यंत शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत होती. परंतु, आता कोरोनाने गावखेड्यात पाय पसरायला सुरुवात केली आहे. एकीकडे कुंभारटेकडी परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा सिलसिला सुरु असताना आता रुग्णांवर उपचार करणाऱ्या मुखेड तालुक्यातील एक डॉक्टर आणि परिचारिका कोरोनाच्या कचाट्यात सापडल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी (ता.२२) १७७ अहवाल तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. त्यापैकी शनिवारी (ता.२३) सकाळी ९७ स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ८८ संशयितांचा अहवाल निगेटिव्ह तर तीन जण पॉझिटिव्ह आले. यातील तिन्ही रुग्ण कुंभार टेकडी परिसरातील ज्यात ४८ व ७० वर्षांचे दोन पुरुष तर ४९ वर्षीय महिलेचा समावेश होता. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा १३५ अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये १२० अहवाल निगेटिव्ह तर सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

हेही वाचा - नांदेड कारागृहातील ६० कैद्यांची सुटका

कुंभारटेकडी परिसरातील पाच जण पॉझिटिव्ह
या सहा पॉझिटिव्ह रुग्णात कुंभारटेकडी परिसरातील दोघांचा समावेश असल्याने दिवसभरात कुंभारटेकडी परिसरातील पाच जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कुंभार टेकडी परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, कुंभारटेकडी परिसरात पॉझिटिव्ह रुग्णांची मालीका का सुरु झाली? हे शोधणे जिल्हा प्रशासनापुढे नवे आव्हान उभे राहिले असतानाच तर उर्वरित चार पॉझिटिव्ह व्यक्तींमध्ये करबला नगरातील दोन व मुखेड तालुक्यातील एका ३४ वर्षाचा डॉक्टर व २२ वर्षाच्या परिचारिकेचा समावेश असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सव्वाशेवर जाऊन पोहचली आहे.

हेही वाचा - का? फेकले तिने बाळाला शेतात, कारण वाचून हैराण व्हाल...

आयसीएमआर पथक आज दौऱ्यावर

रविवारी (ता.२४) केंद्राचे आयसीएमआर पथक नांदेड दौऱ्यावर येत असून, त्यापूर्वी जिल्ह्यात पहिल्यांदाच एक डॉक्टर आणि परिचारिका कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने आरोग्य विभागाची चांगलीच धांदल उडाली आहे. तर कुंभारटेकडी परिसरात वरचेवर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या का? वाढत आहे. याचा शोध घेणे हे आरोग्य विभागापुढे मोठे आव्हान असणार आहे.

शनिवारी सायंकाळपर्यंतची आकडेवारी
एकुण पाझिटिव्ह - १२५
उपचार करुन घरी परतलेले - ५२
मृत्यू - सहा
फरार - दोन
उपचार सुरु - ६२

शनिवारी आढळले या भागात रुग्ण
कुंभार टेकडी: दोन
करबला : दोन
मुखेड: दोन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Reached Out To The Two Fighters A Sensation In The Health Department Nanded News