कोरोना अपडेट : नांदेडला २२ वा बळी, एकूण बाधित रुग्णांची संख्या ४८४

File photo
File photo
Updated on

नांदेड : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, मंगळवारी (ता. सात) सायंकाळी आलेल्या अहवालात २६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत, तर दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आता रुग्णांची एकूण संख्या ४८४ झाली असून मृतांची एकूण संख्या २२ वर गेली आहे. सध्या १२७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असून, ३३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एकाच दिवशी २६ रुग्णसंख्या वाढल्याने ही विक्रमी वाढ असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

इतवारा चौक बाजार येथील ८३ वर्षीय वृद्धाचा मंगळवारी (ता.सात जुलै) पहाटे अडीचवाजेच्या सुमारास मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. रविवारी ते उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. 

सोमवारी (ता. सहा) दिवसभरात जिल्हा प्रशासनाकडून सकाळी नऊ, सायंकाळी पाच, रात्री सात व १० अशा चार वेळा कोरोना रुग्णांची संख्या जाहीर केली. त्यामुळे दिवसभरातील एकूण रुग्णसंख्या २१ झाली.  जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण कोरोना बाधित रुग्णसंख्या ४५८ इतकी झाली आहे. यातील ३३४ रुग्णांना बरे करून घरी सोडण्यात आले आहे. १०४ रुग्णांवर कोविड सेंटर तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर २१ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोमवारी (ता.सहा जुलै) दिवसभरात चार टप्प्यात आलेल्या अहवालात नांदेड महापालिकेचे उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांच्यासह २१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या दहा दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. लॉकडाउन शिथिल केल्याचा हा परिणाम असल्याची शक्यता वर्तविली जात असताना काहीजण हवेतूनही संसर्ग होत असल्याचे सांगत आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून अद्यापपर्यंत अधिकृत स्पष्टिकरण दिलेले नाही. 

कॉग्रेस कार्यकर्त्यांमध्ये काळजीचे वातावरण
पालकमंत्री अशोक चव्हाण, नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हबर्डे, माजी महापौर अब्दुल सत्तार, त्याचे चिरंजीव व नगरसेवक अब्दुल गफार, माजी नगरसेवक रहिमखान या कॉंग्रेस पुढाऱ्यांपाठोपाठ मनपाच्या उपमहापौरांनाही कोरोनाची लागण झाल्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उपमहापौरांचा अहवाल पॉझिटिव्ह 
आधीचे सर्व कॉंग्रेस पुढारी कोरोनामुक्त होवून घरी परतल्यानंतर उपमहापौरांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माजी महापौर पुत्राच्या संपर्कात आल्यामुळे त्यांनी गेल्या दहा दिवसांपासून एका खासगी रुग्णालयात स्वतःला क्वारंटाईन करून घेतले होते. या कालावधीत ते कुटुंबिय किंवा इतर कोणाच्याही संपर्कात आले नाही. यापूर्वीचे दोन वेळा दिलेले त्यांचे नमूने निगेटीव्ह आले. तिसऱ्या तपासणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
 
सोमवारी दिसभरात असे वाढलेत रुग्ण
सकाळी नऊ वाजता :  ५४ वर्षीय पुरुष ( बोमनाळे गल्ली नायगाव देगलुर), ६५ वर्षीय पुरुष (तागलेन गल्ली मुखेड), ३५ वर्षिय पुरुष (नाथनगर देगलूर)
सायंकाळी पाच वाजता :  पुरुष (वय ३५) चिंचाळा, पुरुष (४३) आरळी, महिला (३८) गांधीनगर, पुरुष (५२) गांधीनगर ता. बिलोली, पुरुष (६०) बळीरामपूर ता.नांदेड.
रात्री सात वाजता : पुरुष (५०) श्‍यामनगर नांदेड, पुरुष (किनवट, जि.नांदेड) 
रात्री १० वाजता : पुरुष (१५, ४२, ६८) चक्रधरनगर नांदेड,  महिला (१० व ४०) चक्रधरनगर नांदेड,  पुरुष (४८) बाजार गल्ली मुदखेड, महिला (७०) गणेशनगर नांदेड,  पुरुष (५२) लक्ष्मीनगर देगलूरनाका, पुरुष (६८) संभाजी कॉलनी सिडको, पुरुष (४४), बी अॅण्ड सी कॉलनी चैतन्यनगर, पुरुष (८३) धनगर टाकळी ता.पुर्णा)

कोरोना मीटर
एकुण बाधित : ४५८
उपचार सुरू : १०४
बरे झालेले : ३३४
एकूण मृत्यू : २१         

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com