Voting Counting
Voting Countingsakal

देगलूर विधानसभेसाठी आज मतमोजणी

यात ६४ टक्के मतदारांनी भाग घेतला.

नांदेड : देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शनिवारी (ता. ३०) मतदान झाले. यात ६४ टक्के मतदारांनी भाग घेतला. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (ता. २) देगलूर येथे होणार आहे.देगलूर विधानसभेचे तत्कालीन आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाल्याने पोटनिवडणूक घोषित झाली होती.

यासाठी शनिवारी मतदान झाले होते. यात ६४ टक्के मतदारांनी सहभाग घेतला. या निवडणुकीत भाजपकडून माजी आमदार सुभाष साबणे आणि काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर यांच्यात चुरस झाली होती. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर आघाडीकडून देगलूर विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रचाराची धुरा सांभाळली.

Voting Counting
उरुळी कांचन : चारचाकी गाडीची काच फोडून पन्नास हजार लंपास

तर भाजपनेही जोरदार टक्कर देत खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली होती. दरम्यान आज देगलूर येथे होणाऱ्या मतमोजणीकडे राज्याचे लक्ष्य लागले आहे. सकाळी अकरापर्यंत चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती निवडणूक विभागाकडून मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com