लेंडी प्रकल्पावरुन सत्ताधारी व विरोधकांचा श्रेयवाद

file photo
file photo

नांदेड : मुखेड तालुक्यातील लेंडी हा आंतरराज्य जलप्रकल्प केवळ राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मार्गी लागला आहे. असे वक्तव्य नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देगलुर येथील एका कार्यक्रमात केले होते. मात्र त्यांचे वक्तव्यांचे खंडण करुन मुखेडचे माजी आमदार हनमंत बेटमोगरेकर यांनी केले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नामुळेच हा प्रकल्प मार्गी लागला असून या प्रकल्पाला गती देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. या प्रकल्पाचे तेच खरे शिल्पकार असून याचे श्रेय कुणी दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करु नये असा कलगीतुरा भाजप व काॅग्रेस आणि भाजपमध्ये रंगणार असल्याचे चित्र दिसुन येत आहे. 

या संदर्भात अधिक माहिती सांगतांना माजी आमदार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर म्हणाले की, राज्याचे तत्कालीन पुर्नवसनमंत्री कै. पतंगराव कदम हे मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष होते. यावेळी अशोकराव चव्हाण यांच्या सूचनेनुसार 2013 मध्ये तत्कालीन पालकमंत्री डी. पी. सावंत व मी स्वतः मुक्रमाबाद व इटग्याळ (प. मू.) या गावातील भूसंपादीत घरांचा अंशतः मंजूर झालेला मावेजा पूर्णपणे म्हणजेच 100 टक्के देण्यात यावा अशी मागणी केली होती. या मागणीस पुर्नवसन मंत्री कै. पतंगराव कदम यांनी मंजूरी दिली.

अशोकरावामुळेच प्रकल्पग्रस्तांना 100 टक्के मावेजा मिळला आहे

दरम्यान आघाडीचे सरकार नसल्यामुळे मंजूर झालेल्या या वाढीव मावेजाचे लाभ प्रकल्पग्रस्तांना मिळाले नाहीत. 2019 मध्ये महाआघाडीचे सरकार आल्यानंतर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या कामामध्ये विशेष लक्ष घातले. मला सोबत घेवून त्यांनी मुख्यमंत्र्यांची नागपूर येथे भेट घेतली. सातत्याने पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्फत आपण पाठपुरावा केला म्हणूनच आज प्रकल्पग्रस्तांना 100 टक्के मावेजा मिळला आहे. असेही हनमंतराव पाटील बेटमोगरेकर म्हणाले. भाजप सरकारच्या काळात या संदर्भात कोणतीच कारवाई झाली नाही. फक्त घोषणांचा पाऊस मात्र भरपूर    झाला. 

खासदारांनी नसती उठाठेव करुन नये

लेंडी प्रकल्पग्रस्तांसाठी देवेंद्र फडणवीस सरकारने शून्य काम केले. अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी लेंडी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला होता. याची आठवण करून देतानाच पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या आदेशानुसार काही महिन्यांपूर्वी विभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आल्या. या ग्राम सभांमधून प्रकल्पग्रस्तांची बाजू समजून घेतली. शासनाची भूमिका त्यांना सांगितली. त्यानंतरच पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. उर्वरित 11 गावांचे वाढीव मावेजांसह अन्य प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री  अशोकराव चव्हाण यांच्या मार्फत शासनाकडे आपण पाठपुरावा करत आहोत असे सांगताना भाजपने हा प्रश्र्न सोडविला असता तर मग मावेजा वाटपासाठी त्यांना कुणी अडविले होते. काम न करता श्रेय देणे- घेण्याचा कार्यक्रम खासदारांनी बंद करावा असा उपरोधीक सल्ला बेटमोगरेकर यांनी दिला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com