esakal | जिल्ह्यात ३८५ कोरोना पॉझिटिव्ह पुरुषांचा मृत्यू, सर्वाधिक पुरूषांचा हायरिस्कमध्ये समावेश 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

‘सकाळ’ने रविवारी (ता.११) जिल्हा आरोग्य विभागाकडे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारीची माहिती घेतली असता यामध्ये रविवारी दुपारपर्यंत ५३४ बाधितांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यापैकी साडेचारशे कोरोनाबाधित मृत्यू एकट्या नांदेड जिल्ह्यातील आहेत.

जिल्ह्यात ३८५ कोरोना पॉझिटिव्ह पुरुषांचा मृत्यू, सर्वाधिक पुरूषांचा हायरिस्कमध्ये समावेश 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत भर पडत आहे. कोरोना आजारावर दहा दिवसांच्या उपचारानंतर यशस्वी मात करणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. असे असताना दुसरीकडे कोरोना आजाराने मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक पुरुष रुग्णांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ३८५ पुरुष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या आकडेवारीवरुन स्पस्ट दिसून येत आहे. 

‘सकाळ’ने रविवारी (ता.११) जिल्हा आरोग्य विभागाकडे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारीची माहिती घेतली असता यामध्ये रविवारी दुपारपर्यंत ५३४ बाधितांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यापैकी साडेचारशे कोरोनाबाधित मृत्यू एकट्या नांदेड जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्याच्या सिमेलगत असलेल्या लातूर, परभणी, हिंगोली, तेलंगणा, आंध्रप्रदेश, यवतमाळ जिल्ह्यासह तालुका ठिकाणाहून शहरातील विविध शासकीय व खासगी रुग्णालयात उपचारासाठी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे ८२ मृत्यू हे इतर जिल्ह्यातील असावेत. कारण त्याबद्दल आरोग्य विभागाकडून नेमकी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. 

हेही वाचा-  नांदेडहून मुंबईसाठी आता दररोज विशेष रेल्वे

पीरबुऱ्हाण येथे आढळुन आला होता पहिला रुग्ण

जिल्ह्यात सर्वाधिक ३८५ कोरोनाबाधित पुरुषांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे, त्यापाठोपाठ १४९ महिला व एका नऊ महिण्याच्या बालकाचा यात समावेश आहे. जिल्ह्यात पहिला कोरोनाचा रुग्ण पीरबुऱ्हाण येथे आढळुन आला होता. त्यानंतर अबचलनगर येथे दुसरा रुग्ण आढळला होता. पुढे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची जनु मालिकाच सुरू झाली. विशेष म्हणजे कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला त्याच रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा जिल्ह्यातील पहिला कोरोनाचा मृत्यू होय. कोरोनाबाधित रुग्णामध्ये सर्वाधिक पुरुष रुग्णांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये वयोवृद्ध रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचले पाहिजे- सहस्त्रकुंड धबधबा मृत्यूचा हॉटस्पॉट : यवतमाळची पर्यटक महिला गेली वाहून

पॉझिटिव्ह - मृत्यू दर घटला

यातील अनेक बाधित रुग्णांना उच्च रक्तदाब, श्‍वसनाचा त्रास, मधुमेह असे गंभीर आजार याशिवाय बायपास सर्जरी झाल्याने व उशिराने रुग्णालयात दाखल झाल्याने त्यांच्याकडून औषधोपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने या पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे समजते. सध्या जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक असून, मृत्यूचे प्रमाणे देखील कमी झाले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यापुढे देखील जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आणि मृत्यूदरात घट व्हावी यासाठी आरोग्य विभाग कसोटीने काम करताना दिसून येत आहे.