esakal | नांदेडमध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

एका तरूण शेतकऱ्याने वीष पीऊन आत्महत्या केली. ही घटना महाराष्ट्र दिनी शुक्रवारी (ता. एक) सकाळी सात वाजता तल्हारी (ता. किनवट) शिवारात उघडकीस आली.

नांदेडमध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरूण शेतकऱ्याने वीष पीऊन आत्महत्या केली. ही घटना महाराष्ट्र दिनी शुक्रवारी (ता. एक) सकाळी सात वाजता तल्हारी (ता. किनवट) शिवारात उघडकीस आली.

किनवट तालुक्यातील तल्हारी येथील शेतकरी देविदास बाबु बक्केवाड यांच्या शेतात मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. यातूनच कुटुंबियाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याने किनवट येथील महाराष्ट्र ग्रामिण बँकेचे कर्ज काढले. परंतु शेतात सतत नापिकी होत असल्याने कर्जाचा डोंगर वाढत गेला. या कर्जाची परतफेड कशी करायची आणि घरगाडा कसा चालवायचा या दुहेरी संकटात सापडलेल्या देविदास बक्केवाड या शेतकरी हा ता. ३० एप्रिल रोजी घरातून निघून गेला.

हेही वाचाNanded Breaking : नांदेडमध्ये आणखी तीन पॉझिटिव्ह, रूग्ण संख्या २९, मृत्यू २

इस्लापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

तो एक मेच्या पहाटे तल्हारी शिवारात मृतावस्थेत आढळून आला. नातेवाईकांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. त्यानंतर इस्लापूर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी पंचनामा केला. बाबू गजरात बक्केवाड यांच्या माहितीवरुन इस्लापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस नाईक श्री. बेरुळकर करत आहेत. 

जिल्ह्यातील एका पोलिस निरीक्षकासह नऊ पोलिसांना 

नांदेड : पोलिस विभागात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना तेसच उल्लेखनीय आणि प्रशंसनीय सेवेबद्दल पोलिस महासंचालक यांचे बोधचिन्ह, सन्मानपत्र व प्रशस्तीपत्र जिल्ह्यातील एका पोलिस निरीक्षकांसह नऊ पोलिसांना जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांना शासकिय ध्वजारोहन कार्यक्रमात पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. 

येथे क्लिक करा - भयंकरच : गुरुद्वाराचे ‘ते’ कर्मचारी फरारच, अहवाल मात्र कोरोना पॉझिटिव्ह

बोधचिन्ह व सन्मापत्र जाहीर

बोधचिन्ह व सन्मापत्र जाहीर झालेल्यांमध्ये नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलिस निरीक्षक प्रशांत पवार, हवालदार माधव पल्लेवाड, नांदेड ग्रामिणचे हवालदार अशोक देशमुख, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नामदेव सोनकांबळे, सहाय्यक फौजदार खामराव वानखेडे, शामसुंदर छत्रकर, दहशतवाद विरोधी पथकाचे बालाजी सोनटक्के, रविंद्र धाबे, सूर्यकांत घुगे, मारोती केसगीर यांचा समावेश आहे. सर्वांचे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, विजय पवार यांच्यासह आदीनी अभिनंदन केले आहे. 
 

loading image