esakal | अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत फडणवीसांनी धीर दिला | Devendra Fadanvis In Nanded
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra fadanvis

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत फडणवीसांनी धीर दिला

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जि. औरंगाबाद) : अतिवृष्टीमुळे खरिपाच्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले असून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने सरसकट मदत देण्याची गरज आहे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शनिवारी (ता.दोन) शेलगाव येथे केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अतिवृष्टीमुळे (Rain) नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या ‌व्यथा समजण्यासाठी अतिवृष्टीमुळे नुकसान (Nanded) झालेल्या पिकांचे झाडं, कापसाचे बोंडे ऊस आदींची भेट विरोधी पक्षनेत्यामार्फत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुम़ंत पाटील राजेगोरे यांनी दिली. अर्धापूर तालुक्यातील (Ardhapur) शेतीच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधत त्यांच्या अडचणी व‌ व्यथा समजून घेतल्या. शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, महानगर अध्यक्ष प्रवीण साले, प्रणिता देवरे, भाजपचे जिल्हा व्यंकटराव गोरेगावकर, धर्मराज देशमुख, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, निलेश देशमुख, तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी, सुधाकर कदम, अवधूत कदम, जठण मुळे, तुळशीराम बंडाळे, शंकरराव राजेगोरे, शिवराज जाधव, आत्माराम राजेगोरे, माणिका राजेगोरे, प्रमोद राजेगोरे, बाबुराव राजेगोरे, विराज देशमुख, शिवराज जाधव आदी उपस्थित होते.

हेही वाचा: नांदेड शहरावर धुक्याची चादर, हिवाळ्याच्या आगमनाची चाहूल

अर्धापूर तालुक्यातील तिन्ही म़ंडळात अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील खरिपाच्या पिकांना खुप मोठा फटाका बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून‌ नेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी (ता.एक) तालुक्यातील पिंपळगाव महादेव बेलसर, लोणी लहान आंबेगाव आदी गावातील शेतकरी नागरिकांना भेट देवून अडीअडचणी समजून घेतल्या. या पाहणी दौऱ्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अर्धापूर तालुक्यातील शेवगाव , पिंपळगाव महादेव, नांदरला आदी गावांना भेटी देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. पिंपळगाव महादेव येथील युवक गावाजवळून जाणाऱ्या मेंढला नाल्याला आलेल्या पूरात वाहुन गेला होता. झुंजारे कुटुंबाला भेट देवून सांत्वन केले. यावेळी सरपंच कपिल दुधमल ,उपसरपंच उध्दव कल्याणकर ,संतोष कल्याणकर ,जगन कल्याणकर आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी, नागरिकांनी आपल्या व्यथा मांडून तातडीने मदत देण्याची मागणी केली. तसेच हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून‌ नेला आहे. त्यामुळे विम्याची रक्कम त्वरित द्यावी अशी मागणी केली. तसेच केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडून तातडीने मदत देण्याची मागणी केली.

loading image
go to top