esakal | धर्माबाद : गौण खनिजाचे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; ठोठावला ११ लाख ६४ हजाराचा दंड

बोलून बातमी शोधा

धर्माबाद कारवाई
धर्माबाद : गौण खनिजाचे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; ठोठावला ११ लाख ६४ हजाराचा दंड
sakal_logo
By
सुरेश घाळे

धर्माबाद (जिल्हा नांदेड) : तालुक्यात अनेक ठिकाणी अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन करुन वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. परंतु तालुक्यातील बन्नाळी येथे ता. १३ एप्रिल रोजी पहाटेपासून अवैध मुरुमाचे उत्खनन करुन वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार श्री. ढवळे व पोलिस कर्मचाऱ्यांनी छापा मारुन एक जेसीबी व चार ट्रक्टर जप्त केले होते. सदरील प्ररकरणात तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांनी ११ लाख ६४ हजार रुपयांचा दंड ठोठावले आहे.

धर्माबाद तालुक्यातील बन्नाळी येथे सोमवारी (ता. १९) एप्रिल रोजी पहाटेपासून अवैध मुरुमाचे उत्खनन करून वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत होती. सदरील प्ररकरणास मंडळ अधिकारी व तलाठी यांची मुकसंमती होती. त्यामुळे बन्नाळी येथे पहाटेपासून जेसीबीद्वारे अवैध मुरुमाचे उत्खनन करून वाहतूक केल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत होता. सदरील प्ररकरणाची माहिती पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांना मिळताच त्यांनी बन्नाळी येथे होत असलेल्या अवैध मुरुमाचे उत्खनन करणाऱ्या ठिकाणावर छापा मारण्याचे सुचना सहाय्यक फोजदार ढवळे यांना दिले होते.

हेही वाचा - दातृत्वाची जाण असणाऱ्यांकडूनच सामाजिक भान जपले जाते

यावरुन सहाय्यक फौजदार ढवळे, पोलिस अमलदार वैजनाथ कानगुले, बालाजी नागमवार, सचिन गडपवार, संतोष घोसले, दत्तात्रय गुरुपवार यांनी सापळा रचून सदरील ठिकाणी छापा टाकून एक जेसीबी व चार ट्रक्टर जप्त केले. व पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांनी सदरील प्ररकरणाचा अहवाल तहसिलदार दत्तात्रय शिंदे यांना पाठविला. यावरुन तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांनी जेसीबी सात लाख ५० हजार, दोन ट्रक्टर मालकास प्रत्येकी एक लाख सात हजार प्रमाणे दोन लाख १४ हजार व दोन ट्रक्टरला प्रत्येकी एक लाख प्रमाणे दोन लाख मिळून एकूण ११ लाख ६४ हजार रुपयांचा दंड ठोठावल्यामुळे मुरुमाचे अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे