esakal |  जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल , बुधवारी २५३ कोरोनामुक्त ः ९६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

जिल्ह्यातील कोरोना रुग्ण आणि मृत्यू दरात घट न झाल्याने आरोग्य विभागात फेरबदल करण्यात आले होते. विष्णुपुरी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के यांची उचलबांगडी करुन त्यांच्या जागी अधिष्ठाता म्हणून डॉ. सुधीर देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली, तरी देखील पॉझिटिव्ह रुग्णासोबतच जिल्ह्यातील मृत्यूदर कमी होत नव्हता. त्यामुळे आता काय असा प्रश्‍न होता. मात्र मागील काही दिवसापासून जिल्ह्यात मृत्यूदर घटल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

 जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल , बुधवारी २५३ कोरोनामुक्त ः ९६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - मागील तीन महिण्यांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी मोठ्या प्रमाणावर वाढत होती. मात्र गेल्या आठवड्याभरापासून कोरोनाबाधित आणि पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूदरात वरचेवर घट होत आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याने जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येत आहे. 


मंगळवारी (ता.१३) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी बुधवारी (ता.१४) ८९९ अहवाल प्राप्त झालेत्यापैकी ७६० निगेटिव्ह, ९६ जणांचे अवहाल पॉझिटिव्ह, २५३ रुग्ण कोरोनामुक्त, तर तीन बाधितांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. 

हेही वाचा- नांदेडचा आणि माझा कायमचा ऋणानुबंध - ज्येष्ठ साहित्यिक मारूती चित्तमपल्ली

१५ हजार १५६ कोरोनाबाधित रुग्णांनी आजारावर मात

विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या चौफाळा येथील महिला (वय ६४), लुंगारे गल्ली कंधार पुरुष (वय ६०) तर सराफा गल्ली नांदेड येथील एका पुरुष (वय ८०) अशा तीन कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळपर्यंत कोरोनामुळे जिल्हाभरात मृत्यूची संख्या ४६४ वर पोहचली आहे. दहादिवसाच्या उपचारानंतर बुधवारी जिल्हा शासकीय रुग्णालय- १६, विष्णुपुरी शासकीय रुग्णालय- एक, एनआरआ, पंजाब भवन, महसूल भवन आणि होम क्वॉरंटाईनमध्ये असलेल्या १७० बाधितांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातुन सुटी देण्यात आली. आतापर्यंत १५ हजार १५६ कोरोनाबाधित रुग्णांनी आजारावर मात केली आहे. 

हेही वाचा- नांदेड : जिल्‍ह्यात गुरुवारी जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्‍यात येणार- वर्षा ठाकूर

१५ हजार १५६ बाधितांनी कोरोनावर मात

प्रयोग शाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालात नांदेड महापालीका क्षेत्रात- ६२, नांदेड ग्रामीण- पाच, अर्धापूर-एक, हिमायतनगर-एक, नायगाव-दोन, चार, माहूर-दोन, भोकर-तीन, मुखेड-तीन, किनवट-चार, धर्माबाद-एक, बिलोली-चार, कंधार-एक, परभणी-दोन, हिंगोली- एक असे ९६ बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १७ हजार ६९८ वर जाऊन पोहचला आहे. त्यापैकी १५ हजार १५६ बाधितांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या एक हजार ९६८ बाधितावर औषधोपचार सुरू आहेत. त्यातील ४५ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. 

कोरोना मीटर ः 

बुधवारी पॉझिटिव्ह रुग्ण- ९६ 
बुधवारी कोरोना मुक्त- २५३ 
बुधवारी मृत्यू- तीन 
एकूण पॉझिटिव्ह- १७ हजार ६९८ 
एकूण कोरोनामुक्त- १५ हजार १५६ 
एकूण मृत्यू- ४६४ 
उपचार सुरू- एक हजार ९६८ 
गंभीर रुग्ण- ४५ 
अहवाल प्रतिक्षा- ४६१