नांदेड जिल्ह्यातील २५ मंडळांत दुष्काळसदृश्‍य परिस्थिती, प्रशासनाला द्यावे लागणार लक्ष

जून ते सप्टेंबर या कालावधीत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमानाची नोंद झालेल्या नांदेडमधील २५ महसूल मंडळात राज्य शासनाने दुष्काळसद्दश्य परिस्थिती जाहीर केली आहे. या २५ मंडळात शासनाने आठ प्रकारच्या सवलती लागू केल्या आहेत.
Nanded News
Nanded Newssakal

Nanded News : जून ते सप्टेंबर या कालावधीत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमानाची नोंद झालेल्या नांदेडमधील २५ महसूल मंडळात राज्य शासनाने दुष्काळसद्दश्य परिस्थिती जाहीर केली आहे. या २५ मंडळात शासनाने आठ प्रकारच्या सवलती लागू केल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र अजूनही सवलतीची अंमलबजावणी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील बऱ्याच भागात जून ते सप्टेंबर या कालावधीत कमी पर्जन्यमानाची नोंद झाली होती. यामुळे शासनाच्या मंत्रीमंडळ उपसमितीने राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ घोषित करुन सवलती लागू केल्या होत्या.

परंतु यानंतर जून ते सप्टेंबर या कालावधीत अनेक महसूल मंडळात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आल्याने शासनाने राज्यातील एक हजार २१ महसुली मंडळामध्ये दुष्काळ सद्दश्य परिस्थिती घोषित करुन शासन आदेश जारी केला. यात नांदेड जिल्ह्यातील २५ महसुली मंडळाचा समावेश आहे.

शासनाने दुष्काळ सद्दश्य परिस्थिती जाहीर केल्यामुळे या मंडळात सवलती लागू झाल्या. यात जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेतंर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथीलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर व टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज जोडणी खंडीत न करणे याचा समावेश आहे.

Nanded News
Revenue Department : लाचखोरीत महसूल विभाग आघाडीवर; 'महसूल'चे पाच अधिकारी जाळ्यात

या उपाययोजना लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी ता. १३ नोव्हेंबर २०२३ रोजी संबधीत विभाग प्रमुखांना दिले आहेत. परंतु या उपाययोजनांची अंमलबजावणी संबधीत विभागाने केली नाही किंवा दुष्काळी उपाययोजना कोणत्या आहेत.

त्या संबधीत महसुल मंडळातील शेतकऱ्यांना माहिती नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे आता त्यात जिल्हा प्रशासनाला लक्ष द्यावे लागणार आहे.

Nanded News
Nanded News : नेत्यांना प्रचारासाठी गावबंदी कराल तर कारवाई करु, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा इशारा

या २५ महसूल मंडळांचा समावेश

जिल्ह्यातील २५ महसुली मंडळात सरसम, जवळगाव (ता. हिमायतनगर), पिंपरखेड, निवघा (ता. हदगाव), कंधार, कुरुळा, फुलवळ, उस्माननगर, बारुळ, पेठवडज (ता. कंधार), सोनखेड, कापसी बुद्रुक, कलबंर (ता. लोहा), मुखेड, मुक्रमाबाद, जांब बुद्रुक (ता. मुखेड) हनेगाव (ता. देगलूर), कुंटूर, बरबडा, नायगाव (ता. नायगाव), वजिराबाद, तुप्पा, वसरणी, विष्णुपुरी, तरोडा बुद्रुक (ता. नांदेड) यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com