वृद्ध दांपत्याने केला लग्नाचा वाढदिवस रुग्णालयात साजरा...

Nanded Photo
Nanded Photo

नांदेड - रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांचा वाढदिवस रुग्णालयात साजरा केल्याच्या अनेक घटना घडत असतात. पण एखादे दांपत्य ठणठणीत आणि घरी असताना देखील त्यांनी लग्नाचा ७० वा वाढदिवस रुग्णालयात साजरा केला अशी घटना दुर्मिळच. एका वृद्ध दांपत्याने त्यांचा लग्नाचा वाढदिवस रयत रुग्णालयातच साजरा करण्याचा हट्ट धरला आणि त्यांचा हट्टही त्यांच्या परिवाराने पुरविला. 

कोरोनाच्या भीतीमुळे अनेकजण घरी आहेत. लग्न, समारंभावर देखील मर्यादा आली आहे. त्यामुळे रुग्णालयातच काय बाजारात जाताना देखील लोक काळजी घेत आहेत. अशा स्थितीत रुग्णालयात जाऊन वाढदिवस साजरा करण्याचे धाडस कुणी करणार नाही. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. परंतु कुसुम व जगदीश अवधिया या वृद्ध दांम्पत्यानी त्यांच्या लग्नाचा ७० वा वाढदिवस चक्क रयत रुग्णालयातील रुग्णांना लायन्सचा डब्बा देऊन साजरा केला. त्यांनी अनोख्या पद्धतीने केलेल्या या वाढदिवसाची चर्चा होत आहे.     

मागील दोन वर्षापासून उपक्रम

अलीकडे लग्नाचा वाढदिवस विसरल्याने भांडणे होतात. भांडण विकोपाला जातात. पहिला दुसरा नव्हे तर लग्नाचा तब्बल ७० वा वाढदिवस रयत रुग्णालयातील गरजूंना लॉयन्सचा डबा देवून कुसुम व जगदीश अवधिया या वयोवृद्ध दांम्पत्यानी साजरा केला असून यावेळी संयोजक दिलीप ठाकूर यांची उपस्थिती होती. मागील दोन वर्षापासून रयत रुग्णालयात अनेक दानशूर नागरिक कुटुंबातील महत्त्वाचा दिवस रुग्णसेवा करून साजरा करतात. 

स्वतःच्या हस्ते रुग्णांना दिला डबा

हैद्रराबाद येथील स्नेहलता महेशराज जायस्वाल यांनी आपल्या आई-वडिलांच्या प्रेमाखातर लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलकडे डबे देण्यासाठी नोंदणी केली होती. जगदीशजी अवधिया (वय ९४) आणि कुसुम अवधिया (वय ९०) यांनी लॉकडाउन शिथिल झाल्यामुळे स्वतःच्या हस्ते रुग्णांना डबा देण्याची इच्छा व्यक्त केली. दोघांची प्रकृती उत्तम असल्यामुळे त्यांचा मुलगा प्रविण यांनी दोघांना रयत रुग्णालयात आणले. प्रविण, सपना, ॲड. प्रशांत, तन्वी या अवधिया कुटुंबातील सदस्यांसह रयत रुग्णालयात दोघांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी रयत रुग्णालयाचे उपाध्यक्ष जाधव व सुधाकर टाक, नरेंद्र पटवारी, स्वयंसेवक मन्मथ स्वामी, राजेशसिंह ठाकूर हे उपस्थित होते.श्री गुरुजी रुग्णालयात लॉयन्सचे डबे  वितरण करण्यासाठी नोंदणी सुरु असून दानशूर नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष डॉ. विजय भारतीया, उपाध्यक्ष संजय अग्रवाल, सचिव डॉ. मोहन चव्हाण, कोषाध्यक्ष शिवा शिंदे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com