वीज मिटरचे रिडींग बील प्रिंटींग वाटप सुरू- दत्तात्र्य पडळकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जून 2020

कोवीड-19 च्या अटी शर्तींच्या अधीन राहून जिल्हा प्रशासनाची परवानगी, वीजग्राहकांनी सहकार्य करण्याचे महावितरणचे आवाहन.

नांदेड : कोवीड-19 च्या संक्रमण काळात गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून बंद करण्यात आलेले वीज मीटरचे रिडी्ंग तसेच वीजबिलाचे प्रिंटींग व वाटप सुरू करण्याचा म्हत्वपुर्ण निर्णय महावितरणने घेतला आहे.

लॉकडाऊनमध्ये शिथीलता मिळाल्यानंतर महावितरणचा कारभार पुर्वपदावर येण्यासाठी जिल्हाप्रशासनाकडे मागणी केली होती. त्यानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या हमीवर जिल्हाप्रशासनाने परवानगी दिली आहे. बुधवार (ता. तिन) पासून सुरू करण्यात आलेल्या मीटर रिडी्ंगसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यास वीजग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी केले आहे.

हेही वाचा -  लग्नात फुलांची जागा घेतली सॅनिटायझरने

ग्राहकांना सरासरी वीज देण्यात आले होते

कोवीड-19 विषाणूचे संक्रमण वाढू नये याकरिता लॉकडउनच्या परिस्थितीत महावितरणने मार्च महिन्यापासून मीटर रीडिंग घेणे, वीज बिलाची प्रिंटिंग व वाटप बंद केले होते. दरम्यानच्या दोन ते अडीच महिन्याच्या कालावधीत मिटर रिडींग न घेतल्यामुळे ग्राहकांना सरासरी वीज देण्यात आले होते. तसेच बिलाचे वाटप ही बंद होते. त्यामुळे बहुसंख्य वीजग्राहकांना बिल भरण्यास अडचण निर्माण झाली होती.
 
तिन्ही जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) वगळून

नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हा प्रशासनाने महावितरणची मागणी कोवीड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांमधील नियम व अटी शर्तींच्या अधीन राहून तिन्ही जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) वगळून इतर ठिकाणी मीटर रीडिंग घेण्यास व वीज बिल वाटप करण्यास परवानगी दिली आहे. ग्राहकांचे मीटर रीडिंग घेत असताना सदरील कर्मचारी यांना मास्क वापरणे, सॅनीटायझरचा वापर तसेच विज बिल मीटर रीडिंगच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांनी सामाजिक अंतर या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

येथे क्लिक करा ब्रेकिंग न्यूज - नांदेडला एका दिवसात २३ पॉझिटिव्ह

वीजग्राहकांनी रीडींगसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यास सहकार्य करावे

सर्व विभागप्रमूखांनी तसेच मीटर रिडींग एजन्सीधारकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कोवीड-19 च्या अनुषंगाने सर्व नियमांचे पालन करून काम करण्याच्या सुचना द्याव्यात असे निर्देश मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी दिले आहेत. सोबतच वीजग्राहकांनी रीडींगसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यास सहकार्य करावे अन्यथा पुन्हा सरासरी देयक देण्यात येईल ही बाब लक्षात घेवून सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electricity meter reading bill printing distribution started Dattatrya Padalkar nanded news