सुविधांसह लोकाभिमूख गतिमान प्रशासनावर भर; पालकमंत्री अशोक चव्हाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुविधांसह लोकाभिमूख गतिमान प्रशासनावर भर; पालकमंत्री अशोक चव्हाण

सुविधांसह लोकाभिमूख गतिमान प्रशासनावर भर; पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड : प्रशासकीय सोईच्या दृष्टीने अनेक नानाविध तंत्रज्ञानावर आधारित माध्यमे विकसीत झाली आहेत. या माध्यमांचा जिल्ह्यातील प्रशासनाला लोकाभिमूखतेची जोड देऊन सर्वसामान्यांचे प्रश्न तत्काळ मार्गी लागावेत यावर आम्ही भर दिला आहे. जिल्ह्याच्या विकासाला लोकप्रतिनिधींच्या सहमतीतून ज्या सभागृहात नियोजनाचा आराखडा तयार केला जातो. त्या सभागृहालाही आता अत्याधुनिक माध्यम व तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे नांदेड जिल्ह्याच्या वैभवाला नवी जोड मिळाल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा: पटियाला मधुन लढणार कॅप्टन अमरिंदर सिंह; म्हणाले "मी पळून..."

जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्ह्यातील पाच नगरपरिषदांना सुसज्ज अग्निशमन दल वाहनाच्या लोकार्पणप्रसंगी ते शनिवारी (ता.२०) बोलत होते. दरम्यान डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथील मुख्य सभागृहात उभारण्यात आलेल्या नवीन भव्य डिजिटल एलईडी डिस्प्लेचे अनावरण, ग्रीन जिमचे उद्‍घाटन, श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे आरोग्य विभागाच्या १० रुग्णवाहिकेचे लोकार्पण, जिल्हा क्रीडा संकुल येथील बॅटमेंटन कोर्टचे उद्‍घाटन, नांदेड वाघाळा शहर मनपाच्या स्टेडिअम परिसरातील बॅटमेंटन कोर्टचे उद्‍घाटन आणि क्लब रोडच्या सुशोभिकरणाचेही लोकार्पण आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर जयश्री पावडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने उपस्थित होते.

हेही वाचा: लसीकरण वाढवण्यासाठी केंद्राची नवी आयडीया; लकी ड्रॉ आणि इतर उपक्रमांचा घेणार आधार

जिल्ह्यातील मुदखेड, धर्माबाद, बिलोली, कुंडलवाडी आणि अर्धापूर अशा पाच नगरपरिषदांना नवीन अग्निशमन वाहनांची उपलब्धता करून देण्यात आली असून, संबंधित नगरपरिषदांचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना सदर वाहनांच्या चाव्या देण्यात आल्या आहेत.

loading image
go to top