नांदेडला ‘श्री’ विसर्जनासाठी १४ मूर्ती संकलन केंद्राची स्थापना

अभय कुळकजाईकर
Sunday, 30 August 2020

नांदेड महापालिकेच्या वतीने पासदगाव आणि आसना येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही कृत्रिम तलाव करण्यात आला असून या ठिकाणी संकलीत केलेल्या श्रींच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. तसेच श्रीचे निर्माल्य इतरत्र टाकू नये तर ते निर्माल्य संकलन गाडीतच देऊन महापालिका प्रशासनास व निसर्ग संवर्धनास सहकार्य करावे तसेच कोरोना संसर्गापासून बचाव करावा, असे आवाहन आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी केले आहे. 

नांदेड - कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करुन ‘श्री’ मूर्तीच्या विसर्जनासाठी नदी घाटावर भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी नांदेड वाघाळा महापालिकेच्या वतीने तयारी करण्यात आली आहे. महापालिकेच्या सहा क्षेत्रीय कार्यालयातंर्गत १४ ठिकाणी श्री मूर्ती संकलन केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. 

नांदेड शहरातील श्री मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेने तयारी केली असून गोदावरी नदीवरील विष्णुपुरी, गोवर्धन घाट, नगीन घाट, राम मंदिर घाट, नावघाट, साईबाबा मंदिर कौठा यासह नदीच्या दक्षिण आणि उत्तर बाजूला असलेल्या घाटावर विसर्जन करण्यात येणार आहे. तसेच आसना नदीवर पासदगाव आणि सांगवी येथील घाटावरही तयारी करण्यात आली आहे.

हेही वाचा - Video- उद्धवा, आता तरी उघड मंदिराचे दार; नांदेडमध्ये भाजपचे घंटानाद आंदोलन 

दोन ठिकाणी कृत्रिम तलाव
नांदेड महापालिकेच्या वतीने पासदगाव आणि आसना येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही कृत्रिम तलाव करण्यात आला असून या ठिकाणी संकलीत केलेल्या श्रींच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. तसेच श्रीचे निर्माल्य इतरत्र टाकू नये तर ते निर्माल्य संकलन गाडीतच देऊन महापालिका प्रशासनास व निसर्ग संवर्धनास सहकार्य करावे तसेच कोरोना संसर्गापासून बचाव करावा, असे आवाहन आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी केले आहे. 

अधिकारी, कर्मचारी नियुक्त
यंदाच्या वर्षी कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी आढावा बैठक घेतली. कोरोना महामारीच्या काळात हा उत्सव ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत साजरा करण्याच्या सूचना दिल्या. सर्व घाटांवर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ता. एक सष्टेंबर रोजी श्रींचे विसर्जन होणार आहे. विसर्जनाच्या वेळी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा व महापालिका प्रशासनाने केले आहे. विविध ठिकाणच्या विसर्जन घाटावर वीज पुरवठा, स्वच्छता, जीवरक्षक तसेच रस्त्यांची डागडुजी, रस्त्यावर कुठेही पाणी साचू नये, याची दक्षता घेण्याचे निर्देशही आयुक्त डॉ. लहाने यांनी दिले आहेत.  

हेही वाचलेच पाहिजे - नांदेडच्या वैद्यकीय महाविद्यालयात आजपासून प्लाझ्मा थेरपी उपचार सुरु 

या ठिकाणी संकलन केंद्र 
महापालिकेच्या वतीने तरोडा - सांगवी क्षेत्रीय कार्यालयातंगर्त चक्रधर नगरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, चैतन्य नगरातील साईबाबा मंदिर परिसर, महाकाली देवी मंदिर परिसर येथे संकलन केंद्र सुरु करण्यात आले आहे. अशोकनगर कार्यालयातंर्गत वर्कशॉप पाण्याची टाकी, महाराणा प्रताप चौक व मगनपुरा येथील स्वामी समर्थ मंदिरात तसेच शिवाजीनगर कार्यालयातंर्गत सन्मित्र कॉलनीतील हनुमान मंदिर परिसर, बजाज नगरातील हनुमान मंदिर परिसर, विजयनगरमधील हनुमान मंदिर परिसर, पावडेवाडी नाका, आयटीआय कॉर्नर आणि शिवाजीनगरमधील कोठारी कॉम्प्लेक्स येथे संकलन केंद्र सुरु करण्यात आले आहे. वजिराबाद व इतवारा कार्यालयातंर्गत जुना मोंढा येथील महाराणा प्रतापसिंह व्यापारी संकुल येथे तर सिडको क्षेत्रीय कार्यालयातंर्गत महापालिका क्षेत्रीय कार्यालयात संकलन केंद्र सुरु करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Establishment of 14 idol collection centers for immersion of 'Shri' at Nanded, Nanded news