खासदार हेमंत पाटील यांनी घेतलेल्या जनता दरबाराला शेतकऱ्यांचा प्रतिसाद 

file photo
file photo

नांदेड : मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्याच ठिकाणी शेतकरी आणि अधिकारी कर्मचाऱ्यासमोर प्रकरणाचा निपटारा करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम खासदार हेमंत पाटील यांनी मतदार संघातील हदगाव, हिमायतनगर  आणि महागाव तालुक्यांचा दौरा करून केले. 

पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करणे, शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयात अपमानास्पद वागणूक देणे,अरेरावीची भाषा वापरणे,विदूत रोहित्रासाठी  अडवणूक करणे,कालव्याचे काम निकृष्ट करणे. यामुळे शेतकरी वैतागून गेले होते. हदगाव , हिमायतनगर आणि महागाव तालुक्यातून अनेक तक्रारी खासदार हेमंत पाटील यांच्याकडे प्राप्त झाल्यावर थेट शेतकऱ्यासमोर अधिकाऱ्यांना उभे करून शेतकऱ्यांच्या  कामाचा निपटारा करण्याच्या उद्देशाने तहसील कार्यालयात जनता दरबार चे आयोजन केले होते. तालुक्यातील शेतकऱ्यांना आणि शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना समोरासमोर आणून  "ऑन द स्पॉट " प्रकरण निकाली काढण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने पीककर्ज, अतिवृष्टी अनुदान, पंचनामे, विदूत रोहित्र, या  प्रकरणाचा समावेश होता.

जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने संसदेत प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले

यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी अधिकारी शेतकऱ्यांना समोरासमोर उभे करून प्रकरणे निकाली काढले आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले आणि जनतेसमोर अनेक प्रकरणाचा निपटारा केला. तसेच दौऱ्यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली आणि पंचनामे  तात्काळ करून मदत मिळवून द्यावी, अश्या सूचना संबंधित अधिकाऱ्याना दिल्या. खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या कार्याची सुरवातच संसदेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन केली ,  तेव्हा पासून आजपर्यंत केवळ जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने संसदेत प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले आहे. मागच्या वर्षी  अतिवृष्टीने नुकसान  झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून दिली होती. दुर्दैवाने यंदा हि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला असून तुमच्याकडे येणारा प्रत्येक शेतकरी हा माणूस आहे, तो परिस्थितीमुळे हतबल आहे. त्याला सुद्धा मानसन्मान आहे त्याची कदर करा. मागील बऱ्याच दिवसापासून नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यातून असंख्य तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे आपण सर्वाना विनंती करण्यात येत आहे. अन्यथा शिवसेना स्टाईलने समजावून सांगितले जाईल. असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले.

यांची होती उपस्थिती

यावेळी त्यांनी थेट शेतकरी आणि सर्व सामान्यासमोर अधिकाऱ्याना धारेवर धरल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचवल्या होत्या. आक्रमक भूमिका घेऊन शेतकरी सर्व सामान्य जनतेला न्याय दिल्याची चर्चा तालुक्यात  सर्वत्र होती. तसेच  यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी  या दौऱ्यात  उटी येथील पंजाब माधव  गावंडे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरी भेट देऊन परिवाराचे सांत्वन केले. तसेच शासनाची सर्व मदत मिळवून देण्याच्या सूचना तालुका कृषी अधिकाऱ्यांना केल्या . खडका येथे कपाशीवरील पडलेल्य बोंडआळीची पाहणी करून याबाबतसुद्धा शासन दरबारी  मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी तहसीलदार इसळकर, अभियंता चव्हाण, गटविकास अधिकारी आंदेलवाड, आरोग्य अधिकारी डॉ.पठाण, कृषी अधिकारी मुखाडे, पोलिस निरीक्षक  राठोड, तलाठी खोकले, तालुका प्रमुख प्रमोद भरवाडे, सतीश नाईक, ठाकरे उमरखेड शहरप्रमुख, शहरप्रमुख राजू राठोड, उपतालुका प्रमुख अशोक तुमवर, संदीप खंदारे, विशाल पांडे, समाधान ठाकरे, उमरखेड महागावचे जनसंपर्क अधिकारी चंद्रसेन आढागळे यांच्यासह आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com