esakal | स्वारातीम विद्यापीठाच्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहण
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सध्याच्या या कोव्हीड महामारीच्या काळात सर्व नियोजनास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे परीक्षा लांबलेल्या आहेत. येणाऱ्या ३ ते २५ आक्टोंबर २०२० दरम्यान विद्यापीठाद्वारे अंतिम वर्षाच्या सर्वच विषयाच्या परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठ प्रशासन करीत आहे.

स्वारातीम विद्यापीठाच्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहण

sakal_logo
By
श्याम जाधव

नांदेड : मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २६ वा वर्धापनदिनानिमित्त गुरुवार ( १७ सप्टेंबर) रोजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर सकाळी आठ वाजता राष्ट्रीय ध्वजारोहण आणि ०८:०५ मिनिटांनी विद्यापीठ ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यापूर्वी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी कुलगुरूंनी उपस्थितांना आपल्या मार्गदर्शनपर दोन शब्दात म्हणाले की, सध्याच्या या कोव्हीड महामारीच्या काळात सर्व नियोजनास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे परीक्षा लांबलेल्या आहेत. येणाऱ्या ३ ते २५ आक्टोंबर २०२० दरम्यान विद्यापीठाद्वारे अंतिम वर्षाच्या सर्वच विषयाच्या परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठ प्रशासन करीत आहे. विद्यार्थांना अभ्यासक्रमामध्ये काही अडचणी येऊ नये म्हणून विद्यापीठाने बरेच अभ्यासक्रम ऑनलाईनद्वारे विद्यार्थांना विद्यापीठाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेऊन चांगल्या पद्धतीने अभ्यास करून पास व्हावे.लवकरच आपण या महामारीतून मुक्त होवून पूर्ववत जिवनमानावर येवू. अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

हेही वाचा -  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची गरुडभरारी

यांची होती उपस्थिती

यावेळी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एल. एम. वाघमारे, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. भगवान जाधव, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजाराम माने, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.रवि सरोदे,  वित्त व लेखाधिकारी डॉ. डी. एम. खंदारे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. ज्ञानोबा मुंढे, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे यांच्यासह अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. कोव्हीड- १९ च्या संसर्गजन्य आजारामुळे सामाजिक अंतराचे पालन करून कार्यक्रम संपन्न झाला.

येथे क्लिक करातळहातावरचे पोट भरायचे कसे, वेठ बिगारी कामगाराचा संतप्त सवाल

छायाचित्र स्पर्धेचे आयोजन

विद्यापीठाच्या वर्धापनदिनानिमित्त हौशी व व्यवसायिक छायाचीत्राकारासाठी खुल्या छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकास कुलगुरु डॉ. उद्धव भोसले, प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र गोणारकर व डॉ. पी. विठ्ठल यांनी केले.

संपादन - प्रल्हाद कांबळे