esakal | मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आज पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नांदेडला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरूवारी (ता. १७ सप्टेंबर) माता गुजरीजी विसावा उद्यान येथील हुतात्मा स्मारक येथे सकाळी नऊ वाजता राष्ट्रध्वज वंदन व संचलनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. कोरोना विषाणुची पार्श्वभूमी विचारात घेता कार्यक्रम सोशल डिस्टिन्सिंग संदर्भातील सर्व नियम पाळून होणार आहे.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आज पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरूवारी (ता. १७ सप्टेंबर) माता गुजरीजी विसावा उद्यान येथील हुतात्मा स्मारक येथे सकाळी नऊ वाजता राष्ट्रध्वज वंदन व संचलनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. तसेच हुतात्मा स्मारकाच्या स्मृतीस्तंभास मानवंदना व पुष्पचक्र अर्पण करण्याचा कार्यक्रम सकाळी साडेआठ वाजता पालकमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने वेळोवेळी ज्या सूचना दिल्या आहेत. त्या निर्देशाचा पालन करुन हा समारंभ होईल. या मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या दृष्टीने इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी साडेआठपूर्वी किंवा साडेनऊ वाजल्यानंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा - परभणी : कांदा निर्यात धोरणाला जिल्ह्यात विरोध, संघटना, शेतकरी आक्रमक 
 
नियमाचे काटेकोर पालन करावे

कोरोना विषाणुची पार्श्वभूमी विचारात घेता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा संपुर्ण कार्यक्रम शारिरिक अंतर (सोशल डिस्टिसिंग) संदर्भातील सर्व नियम पाळून होईल. समारंभास उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींनी राष्ट्रीय पोशाख परिधान करावा. सर्वासाठी मास्क बंधनकारक आहे. सुरक्षित वावराच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहाता यावा, यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येईल. हा कार्यक्रम साजरा करताना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या गृह मंत्रालय व आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय यांनी दिलेल्या सूचनाचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्यानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ, आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे असेही आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे. गृह विभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितानी घ्यावी.

हेही वाचलेच पाहिजे - हिंगोली : बनावट नोटाप्रकरणी नागपूरमधून एकाला अटक 

समारंभाचे युटयूबवर थेट प्रक्षेपण
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त गुरूवारी (ता. १७ सप्टेंबर) जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. सकाळी साडेआठ वाजता माता गुजरीजी विसावा उद्यान येथील हुतात्मा स्मृती स्तंभास पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण व त्यानंतर नऊ वाजता ध्वजवंदन होईल. यावर्षी कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेवून नागरिकांना घरी बसूनच हा कार्यक्रम पहाता यावा यासाठी यु टयूबवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जात आहे. यु टयूबच्या या https://youtu.be/dvgQB_x-DaY या लिंकवर हा कार्यक्रम सर्वांना पाहता येईल. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.