जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांत चौघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 June 2020

दोन महिला व दोन पुरूषांचा समावेश आहे. दोघांचा विद्यूत शॉक लागून तर एका महिलेने गळफास घेउन आत्महत्या केली तर एकीच्या अंगाव वीज पडली

नांदेड : जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. यात दोन महिला व दोन पुरूषांचा समावेश आहे. दोघांचा विद्यूत शॉक लागून तर एका महिलेने गळफास घेउन आत्महत्या केली तर एकीच्या अंगाव वीज पडली. या प्रकरणांची नोंद किनवट, माळकोळी, कंधार आणि हदगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली. 

किनवट तालुक्यातील इस्लामपूर येथील शेख सलीम शेख नबु (वय ३५) याला आपल्या घरी शनिवारी (ता. १३) जबर विद्यूत शॉक लागला. यात तो बेशुद्ध पडल्याने नातेवाईकांनी त्याला गोकूंदा येथील सरकारी रुग्‍णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती डॉ. राजपाल बोडके यांनी किनवट पोलिसांना दिल्यावरुन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस नाईक श्री. संदुपटलेवार करत आहेत.

हेही वाचा -  अबब...! चक्क पोलिस निरीक्षकालाच मारहाण...कुठे ते वाचा

विद्यूत शआॅकने एकाचा मृत्यू

दुसऱ्या घटनेत लोहा तालुक्यातील चोंडी येथे राहणारा संजय कुशन जाधव (वय ३७) हे आपल्या शेतात पिरणीपूर्व मशागत करत होते. शुक्रवारी (ता. १२) दुपारी तिनच्या सुमारास औत हाकताना त्यांचा हात विद्यूत पुरवठा करणाऱ्या तारेला लागला. यात त्यांना शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाला. पोलिस हवालदार ए. एम. केंद्रे यांच्या माहितीवरुन माळाकोळी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक फौजदार श्री. गीते करत आहेत. 

गळफास घेऊन महिलेची आत्महत्या

तिसऱ्या घटनेत हदगाव येथील आरती अवधूत कंधारे (वय २७) हिने कुठल्यातरी कारणावरून आपल्या राहत्या घरी शनिवारी (ता. १३) गळफास घेऊन आत्महत्या केली. प्राथमीक आरोग्य केंद्राची कर्मचारी सुनिता रमेश पेटकर (वय ३९) यांच्या माहितीवरुन हदगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास फौजदार संगिता कदम ह्या करीत आहेत. 

येथे क्लिक कराVideo - ज्या माशांच्या मृत्युमुळे नांदेडमध्ये माजली होती खळबळ, त्याचे कारण आले समोर

वीज पडून महिलेचा मृत्यू 

तर चौथ्या घटनेमध्ये कंधार तालुक्यातील हरबळ येथील अर्चना हनमंत गीरी (वय २६) ही विनायक नामदेव कागणे यांच्या शेतावर मजुरीने शनिवारी (ता. १३) गेली होती. काम करत असतांना अचानक ढग दाटून आले. पहातापहाता विजांच्या कडकडांसह पाऊस सुरू झाला. पावसापासून बचाव व्हावा म्हणून अर्चना गीरी हिने शेतावर असलेल्या गोठ्याचा आधार घेतला. मात्र तिच्या अंगावर वीज कोसळून तिचा जागीच मृत्यू झाला. मारोती आनंदबुवा गिरी यांच्या माहितीवरुन कंधार पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस नाईक श्री. काळे करत आहेत.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four died in different incidents in the district nanded news