esakal | इंधन, गॅस दरवाढीसोबतच खाद्यतेलांच्या किंमती गगनाला भिडल्या

बोलून बातमी शोधा

Nanded News}

पेट्रोल - डिझेलची जितकी आवश्‍यक आहे. त्याच्या कितीतरी पटीने खाद्य तेल व घरगुती गॅसचे महत्व आहे. असे असताना राजकीय अजेंड्यावर केवळ पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरवाढीकडे लक्ष आहे. मात्र, अन्न पदार्थ तयार करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या खाद्य तेलाच्या दरवाढीविरोधात कुठलाही पक्ष, संघटना साधा विरोधही करताना दिसत नाही. 

इंधन, गॅस दरवाढीसोबतच खाद्यतेलांच्या किंमती गगनाला भिडल्या
sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल, डिझेलच्या कच्या तेलांच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने मागील काही दिवसापासून तेलांच्या किंमतीचा भडका उडाला आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्रात वादाच्या ठिणग्या पडत आहेत. एकमेकांविरोधात मोर्चे, आंदोलने केली जात आहेत. असे असताना कळत न कळत मागील तीन चार महिन्यापासून खाद्य तेल देखील प्रतिकिलोमागे ४० ते ४५ रुपयाने महागले आहे. त्यामुळे नांदेडकरांचे बजेट बिघडत चालले आहे. 

पेट्रोल - डिझेलची जितकी आवश्‍यक आहे. त्याच्या कितीतरी पटीने खाद्य तेल व घरगुती गॅसचे महत्व आहे. असे असताना राजकीय अजेंड्यावर केवळ पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरवाढीकडे लक्ष आहे. मात्र, अन्न पदार्थ तयार करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या खाद्य तेलाच्या दरवाढीविरोधात कुठलाही पक्ष, संघटना साधा विरोधही करताना दिसत नाही. 

हेही वाचा- नांदेडच्या शिक्षकास १४ लाखापायी पावणेदोन लाखाचा आॅनलाईन गंडा; गुन्हा दाखल

तेलाच्या किंमतीवर कुणाचेही नियंत्रण नाही

मागील काही महिन्यापूर्वी सोयाबीन डब्बल फिल्टर (खुले) तेल ८५ ते ९० रुपये किलो तर १५ लिटरचा डबा साडेतेराशे रुपयांपर्यंत मिळत होता. परंतु सध्याच्या घडीला सोयाबीनचे खुले तेल १३० रुपये किलो तर पॅकबंद एक लिटर तेलाचे पाकिट १३५ ते १४० रुपये असे मिळत आहे. विशेष म्हणजे विविध खाद्यतेल कंपन्या शेंगदाणा, सुर्यफुल, करडई, सोयाबीनचे सीलबंद पॅकेटच्या माध्यमातून डब्बल फिल्टर तेल विक्री करतात. परंतु त्यांच्या किंमतीवर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येते. त्यामुळे शहरातील विविध दुकानात कंपनीचे तेलाच्या किंमतीमध्ये तफावत दिसून येते. 

हेही वाचा- धक्कादायक: अर्धापुरात राष्ट्रीय महामार्गसाठी संपादित केलेल्या जमीनीचाा मावेजा न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

शुद्धता तपासणार कोण

शुद्ध घाण्याचे तेल म्हणून अनेक दुकानदारांनी व्यवसाय सुरु केला आहे. परंतु शुद्ध तेलाच्या नावाने सुरु असलेल्या दुकानदारांच्या तेलाच्या गुणवत्तेकडे देखील राजकीय नेते, संघटनासोबतच अन्न व औषध प्रशासन विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे भरमसाठ वाढलेल्या खाद्य तेलांच्या किंमतीकडे लक्ष देणार कोण? असा प्रश्‍न सामान्य नागरिकांना पडला आहे. 


विविध खाद्य तेलांच्या सध्याच्या किंमती 
सोयाबीन तेल - १३० किलो 
शेंगदाणा तेल - १६५ रुपये किलो 
करडी तेल - २०० रुपये किलो 
सनफ्लावर तेल - १६५ किलो