पदवीधर मतदान : संशयित कोरोनाग्रस्तांचे मतदान सर्वात शेवटी होणार

प्रल्हाद कांबळे
Sunday, 29 November 2020

औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियाची माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीला महापालिका आयुक्त डाॅ. सुनिललहाने, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रशांत शेळके, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांची उपस्थिती होती.

नांदेड : पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली असून येत्या एक डिसेंबर रोजी सकाळी आठ ते पाच या दरम्यान जिल्ह्यातील १२३ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी ४९ हजार २८५ पदवीधर मतदान करणार पात्र असून सर्व मतदान केंद्रावरून वेब कास्टिंग केली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियाची माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीला महापालिका आयुक्त डाॅ. सुनिललहाने, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रशांत शेळके, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील ३८ हजार ४३२ पुरुष व दहा हजार ८५३ महिला मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समावेश असून निवडणुकीतील उमेदवारांना पसंतीक्रमानुसार मतदान करण्यासाठी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

हेही वाचा - नांदेड : शेतकरी आंदोलकांवरील केंद्राच्या दडपशाही धोरणाचा निषेध- शंकर धोंडगे -

मतदान करताना विशिष्ट खूण पसंतीक्रम सोडून मतदान करणे. पसंतीक्रम न देता मतदान केल्यास संबंधित मतपत्रिका म्हणजेच झालेले मतदान बाद होणार आहे. त्याचबरोबर भारत निवडणूक आयोगाच्या इतर निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीत नोटा'चा पर्याय उपलब्ध नाही. मतदारांना आपल्या आवडत्या उमेदवाराला पसंतीक्रम देणे हाच पर्याय आहे. नांदेड तालुक्यात सर्वाधिक १८ हजार ५४२ आणि माहूर तालुक्यात सर्वात कमी ९०५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानाचा हक्क निश्चितच समाधानकारक नाही. त्याकरिता जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा. संशयीत कोोरनाग्रस्तांचे मतदान सर्वात शेवटी होणार असून मतदान केंद्रावर वैद्यकीय पथक कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Graduate Voting: Suspected Corona Victims will be the last to vote nanded news