नांदेड बाजारात भुईमुगाची आवक सुरू

NND20KJP02.jpg
NND20KJP02.jpg

नांदेड  : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या नवामोंढा बाजारात उन्हाळी भुईमूगाची आवक सुरू झाली आहे. ता. सहा मे पासून बाजारात सुरू झालेली आवक सर्वसाधारण असली तरी दरही स्थिर आहेत. बाजारात चार हजार १९१ क्विंटल भुईमुगाची आवक झाली. यात किमान चार हजार सातशे तर कमाल पाच हजार चारशे रुपये दर मिळाला. सरासरी दर पाच हजार १५० रुपये मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सुत्राने दिली.

दमदार पर्जन्यमानामुळे भुइमुगाची लावगड वाढली 
जिल्ह्यात मागील पावसाळ्याच्या पाच महिन्यात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पासह जलस्त्रोतांचा पाणी आले होते. तसेच भूगर्भातही जलसाठा वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी तसेच उन्हाळी हंगामात पीक घेण्याला प्राधान्य दिले. उन्हाळी हंगामात भुईमूग पिकाची लागवड जिल्ह्यातील कंधार, नायगाव, बिलोल, अर्धापूर, भोकर व उमरी या तालुक्यात प्रामुख्याने केली जाते. 

सध्या पिक काढणीची लगबघ
सध्या पीक काढणीचा हंगाम सुरू असल्यामुळे नांदेड बाजारात भुईमुगाची आवक सुरू झाली आहे. ता. सहा मे पासून ता. २० मे या पंधरा दिवसात नवा मोंढा बाजारात चार हजार १९१ क्विंटल भुईमुगाची आवक झाली. यावेळी भुईमुगाला कमाल पाच हजार चारशे तर किमान चार हजार सातशे रुपये दर मिळाला. सरासरी पाच हजार १५० रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

हेही वाचलेच पाहिजे....गुलाबांची फुले झाली मातीमोल

इतर धान्याचीही आवक चांगली
मागील ता. ११ मे ते ता. १९ मे दरम्यान जिल्ह्यात सोयाबीन, तूर, हरभरा, ज्वारी व हळद या शेतीमालाची आवक बऱ्यापैकी झाली. या आठवड्यात सोयाबीन एक हजार ३८९ क्विंटलची आवक झाली. यास किमान तीन हजार तीनशे तर कमाल तीन हजार ७२५ रुपये दर मिळाला. सरासरी तीनहजार ६५० रुपये दर सोयाबीनला मिळाला. तुरीची आवक ५६ क्विंटल झाली. यास किमान चार हजार सहाशे तर कमाल चार हजार नऊशे रुपये दर मिळाला. सरासरी चार हजार आठशे रुपये दर तुरीला राहिला. ७८६ क्विंटल हरभऱ्याची आवक बाजारात झाली. याच किमान तीन हजार ६५१ तर कमाल तीन हजार ८११ रुपये दर मिळाला. सरासरी तीन हजार ७२५ रुपये दर हरभऱ्याला राहिला. ज्वारीची ६० क्विंटल आवक झाली. यास कमाल एक हजार ८७० तर किमान एक हजार आठशे रुपये दर मिळाला. सरासरी एक हजार ८३१ रुपये राहिला.

साडेदहा हजार क्विंटल हळदीची आवक
सात दिवसात साडेदहा हजार क्विंटल हळदीची आवक
मोंढा बाजारात सध्या हळदीचे आवकही चांगली सुरु झाली आहे. मध्यतंरी कोरोना रुग्ण वाढल्यामुळे काहीसा मंदावलेला बाजार सध्या बहरला आहे. ता. ११ ते ते ता. १९ मे या कालावधीत बाजारात दहा हजार ६५८ क्विंटल हळदीची आवक झाली. यास किमान चार हजार सातशे तर कमाल सहा हजार पाचशे रुपये मिळाला. सरासरी पाच हजार तीनशे रुपये दर हळदीला मिळाल्याची माहिती नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डी. ए. संगेकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

बाजारातील सात दिवसात झालेली आवक व दर
(आवक व दर क्विंटलमध्ये.
शेतमाल.....आवक......किमान......कमाल......सरासरी
भुईमुग.......४,१९१.....४,७००.....५,४००.....५,१५० 
तूर................५६.....४,६००.....४,९००.....४,८००
हरभरा..........७८६......३,६५१.....३,८११.....३,७२५
ज्वारी.............६०.....१,८००.....१,८७०......१,८३१
हळद.......१०,६५८.....४,७००.....६,५००......५,३००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com