पालकमंत्री अशोक चव्हाण यांची अभिनव संकल्पना घेणार २६ जानेवारीला मूर्त स्वरूप

अभय कुळकजाईकर
Tuesday, 5 January 2021

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी अभिनव संकल्पना राबवली असून 'अशोक चव्हाण सेवा सेतू' या सुविधेचे येत्या प्रजासत्ताक दिनी ता. २६ जानेवारी रोजी लोकार्पण होणार आहे. त्यांनी सोमवारी (ता. चार) 'अशोक चव्हाण सेवा सेतू'च्या कार्यालयाला भेट देऊन उभारणीची पाहणी केली.

नांदेड - नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचावा तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या तत्परतेने सुटाव्यात, या हेतूने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी अभिनव संकल्पना राबवली असून त्यांनी सोमवारी (ता. चार) 'अशोक चव्हाण सेवा सेतू'च्या कार्यालयाला भेट देऊन उभारणीची पाहणी केली.

'अशोक चव्हाण सेवा सेतू' या सुविधेचे येत्या प्रजासत्ताक दिनी ता. २६ जानेवारी रोजी लोकार्पण होणार आहे. पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी वैयक्तिक स्तरावर सेवा सेतू हे कॉलसेंटर येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच ता. २६ जानेवारीपासून सुरू करणार आहेत. प्रायोगिक स्तरावर ही सुविधा प्रारंभी भोकर विधानसभा मतदारसंघासाठी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी त्यांच्या फेसबुकवरून दिली आहे. नांदेड शहरात उभारल्या जाणाऱ्या या अत्याधुनिक कॉल सेंटरच्या उभारणीची पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी सोमवारी (ता. चार) पाहणी केली. 

हेही वाचा - दुचाकी चोरांच्या उपद्रवामुळे नांदेडकर झाले त्रस्त, पोलिस प्रशासन मात्र सुस्त 

काय आहे अभिनव संकल्पना
पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्यामार्फत वैयक्तिक स्तरावर सुरू होणारी ही खासगी सुविधा म्हणजे एक कॉलसेंटर असून, येथील दूरध्वनी क्रमांकावर कॉल करून नागरिकांना शासकीय कामकाजाबाबत आपल्या अडी-अडचणी किंवा तक्रारी मांडता येणार आहेत. दररोज शेकडो नागरिक आपल्या समस्या मांडण्यासाठी नांदेड येथील आपल्या कार्यालयात येतात. त्यातील अनेक अडचणी या दूरध्वनीवरून मार्गी लावण्यासारख्या असतात. त्यामुळे अशा नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचावा, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांच्या समस्या तत्परतेने सोडवाव्या, या हेतूने 'अशोक चव्हाण सेवा सेतू' ही सुविधा सुरू केली जाणार आहे. या कॉलसेंटरचा क्रमांक लवकरच जाहीर केला जाईल.

हेही वाचलेच पाहिजे - नांदेड : मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवून देण्यासाठी १० लाखास फसविले 

भोकरसाठी प्रायोगिक स्तरावर राबविणार
प्रारंभी प्रायोगिक स्तरावर ही सुविधा भोकर विधानसभा मतदारसंघासाठी सुरू होणार आहे. नांदेड शहरात उभारल्या जाणाऱ्या या अत्याधुनिक कॉलसेंटरची पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पाहणी केली. पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी यामधील तांत्रिक बाबी व इतर मुद्यांवर तेथील कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर कशा सोडवता येतील, या अनुषंगाने चर्चा करून श्री. चव्हाण यांनी त्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Ashok Chavan's innovative concept will take shape on January 26, Nanded news

टॉपिकस