file photo
file photo

‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या वेतनाची जबाबदारी कंपनीचीच- गुरुद्वारा बोर्ड

नांदेड : गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या विविध यात्री निवासामध्ये स्वछता कार्यासाठी कंत्राट तत्वावर कार्यरत पुणे येथील 'भारती असोसिएशन ऑफ हॉउस कीपिंग' कंपनी यांनी त्यांनी नेमलेल्या खासगी स्वछता कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी जबाबदार असून त्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाशी गुरुद्वारा बोर्डचा संबंध नाही असा खुलासा गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक स. गुरविन्दरसिंघ वाधवा यांनी केला आहे. 

येथे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे सांगण्यात आले आहे की, गुरुद्वारा बोर्डाने सचखंड परिसर, गुरुग्रंथ साहिबजी भवन, एन. आर. आय. यात्री निवास, पंजाब भवन, गुरु अंगददेव जी यात्री निवास, गुरु अमरदासजी यात्री निवास, महाराजा रणजीतसिंघजी यात्री निवासच्या स्वछता कार्यासाठी भारती कंपनी सोबत करार करण्यात आले आहे. सदर कंपनी सोबत ठरलेल्या मासिक करारानुसार त्या कम्पनीला नियमानुसार देयकेद्वारे रक्कम अदा करण्यात येते. कंपनीने त्यांच्याद्वारे नियुक्त कर्मचारी, सेवक इतियादीचे वेतन देणे आवश्यक असून त्यांची जवाबदारी आहे. 

वेतनाची जवाबदारी गुरुद्वारा बोर्ड संस्थेची नाही

त्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाची जवाबदारी गुरुद्वारा बोर्ड संस्थेची नाही. तरी पण काही वर्तमान पत्रात गुरुद्वारा बोर्डाची करणाऱ्या अशयाच्या बातम्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत. असले वृत्त चुकीचे असून गुरुद्वारा बोर्डातर्फे जेवढी गरज असेल त्या प्रमाणात स्वछता सेवक इत्यादी कडून काम करण्याचे सुचवले जाते. त्या अनुषंगाने कंपनीला वेतन अदा करण्यात येत आहे. वरील स्वछता कार्य करणाऱ्या कंपनीच्या काही कर्मचाऱ्यातर्फे काही वर्तमान पत्रात बातम्या प्रकाशित करुन गुरुद्वारा बोर्डाची बदनामी करण्याचे कृत्य करण्यात येत आहे. वरील विषयाची कंपनीतर्फे दखल घेण्यात यावी. अन्यथा गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने संबंधित कंपनीच्या विरोधात कायदेशीर कार्यवाही करावी लागेल असा इशारा गुरविंदरसिंघ वाधवा यांनी दिला आहे. 

सासरच्या मंडळीकडून विवाहितेचा छळ

नांदेड : लग्नात राहिलेला हुंडा माहेराहून आणण्यासाठी एका विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ करणाऱ्या सासरच्या मंडळीवर भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
शहराच्या समतानगर परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेस लग्नानंतर काही दिवस चांगले नांदवले. त्यानंतर तिला त्रास देणे सुरू केले. लग्नात राहिलेला हुंडा घेऊन ये म्हणून तिचा शारिरीक व मानसिक छळ करणे सुरु केला. एवढेच नाही तर तु दिसायला चांगली नाहीस, तुला स्वयंपाक करता येत नाही असे म्हणून तिचा अपमान करत असत. तुला नांदायचे असेल तर माहेराहून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून तगादा लावला. हा त्रास तिने ता. १६ मे २०१५ ते ता. १९ फेब्रुवारी २०२० या काळात सहन केला. मात्र सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून तीस वर्षीय विवाहितेने भाग्यनगर पोलिस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल केला. तपास पोलिस नाईक श्री. हंबर्डे करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com