esakal | गुरुजी मानलं राव तुम्हालाही : 75 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाची कोरोनावर मात!
sakal

बोलून बातमी शोधा

गुरुजी कोरोनामुक्त

गुरुजी मानलं राव तुम्हालाही : 75 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाची कोरोनावर मात!

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर  ( जिल्हा नांदेड ) :  प्रबळ इच्छा शक्ती व आत्मविश्वासच्या जोरावर अर्धापूर तालुक्यातील देगाव कुऱ्हाडे येथील 75 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक तुकाराम चिंचावाड यांनी कोरोनाशी दोन हात करित दहा दिवस उपचार घेत या आजाराला हरविले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कुटंबातील चार सदस्यांना या आजाराची बाधा झाली असतांना खच्चून न जाता धर्याने तोंड देत या महामारीला हरवले आहे. तसेच फोनवर सतत मी बरा होवून घरी येणार सांगत होते.

देवगाव कु-हाडा येथील सेवा निवृत्त शिक्षक तुकाराम चिंचावाड यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. तसेच त्यांच्या कुटंबातील त्यांची पत्नी, मुलगा व नात असे चौघेजण बाधीत झाले होते. यातील तिघांना उपचारासाठी नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली होती.

हेही वाचा - जिद्दीला सलाम : विना रेमडेसिव्हिर, प्राणवायूचे प्रमाण 75 असतांना कपाटे यांनी केली कोरोनावर मात

तुकाराम चिंचडवाड यांना कोरोनाचा संसर्ग बराच वाढला होता. तसेच सिटीस्कॅनचा स्कोअरही वाढला होता. त्यांच्या शरीरातील दहा दिवस आॅक्सीजन ही कमी होत होता. अशा परिस्थितीत वयोवृध्द असणारे तुकाराम चिंचावाड हे घाबरले नाहीत. जिद्दीने त्यांनी कोरोना आजाराचा सामना केला आणि त्यांनी या वयात कोरोना आजारावर मात करुन घरी सुखरुप आले.

त्यांच्या कुटंबियांनी घरी आल्यावर स्वागत केले. त्यांच्या कुटुंबातील पत्नी, मुलगा, नात हे ही कोरोना बाधित झाले. सर्व जण नांदेडला खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले होते. या सर्वांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोना आजारात भीती बाळगली नाही

कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे माझी तब्येत बिघडली म्हणून मी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. मनात कशाची भीती बाळगली नाही. आपण या आजारांवर मात नक्की करणार असे मनोमन ठरवले. डॉक्टर आणि त्यांचा स्टाफ यांनी वेळोवेळी चांगली आरोग्य सेवा दिली. काही दिवसापूर्वी मी कोरोना लस घेतली त्याचा ही बराच फायदा झाला. या आजारात जास्त घाबरु नये. नक्कीच त्यावर मात करता येते.

- तुकाराम चिंचडवाड, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, देगाव कु. ता. अर्धापूर.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image
go to top