गुटखा माफियांना पोलिस कोठडी

file photo
file photo

नांदेड : कांदा वाहतुक करणाऱ्या ट्रकमधून कर्नाटक राज्यातून हिमायतनगरकडे जाणारा तब्बल ३४ लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला होता. अटक केलेल्या चार गुटखा माफियाना रविवार (ता. दहा) पोलिस कोठडीत पाठविले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी सिडको भागातील दूध डेअरी परिसरात बुधवारी (ता. सहा) सकाळी केली होती. 

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संबंध जगभरात लॉकडाउन सुरू आहे. त्यातच भारतातही तिसरा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातही जिल्हा प्रशासन आणि पोलिस या लॉकडाउनची काटोकोरपणे अंमलबजावणी करताना दिसत आहेत. सर्व पोलिस यंत्रणा बंदोबस्तात असल्याचा फायदा अवैध धंदेवाले घेत आहेत. मात्र अवैध धंदेवाल्याचे काळे कारनामे पोलिसांकडून उद्धवस्त करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांची नांगी ठेचण्यासाठी पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व संबंधीत ठाणेदारांना सुचना दिल्या आहेत. 

ट्रक चालकासह चार जणांना अटक 

यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार श्री. चव्हाण, श्री. वडजे आणि आदी कर्मचारी हे बुधवारी (ता. सहा) सिडको परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना मिळालेल्या माहितीनुसार दूध डेअरी परिसरात सापळा लावला. वरिष्ठांना याबद्दल माहिती देऊन कांदा वाहतुक करणारा ट्रक (एमएच-२६-बीई-४०६४) दूध डेअरी जवळ येताच त्यांनी थांबविला. ट्रक चालकासह चार जणांना ताब्यात घेऊन ट्रकची तपासणी केली. ट्रकमध्ये मागच्या बाजूला कांद्याचे पोते तर समोरच्या बाजूला विनापरवाना गुटखा आढळून आला. 

३४ लाखाचा गुटखा व १२ लाखाचा ट्रक जप्त 

सदरचा ट्रक पोलिसांनी जप्त करून नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात लावला. अन्न सुरक्षा अधिकारी प्रविण काळे यांना बोलावून घेऊन सदर मुद्देमालाची तपासणी केली असता ट्रकमध्ये ४० पोते सागर पान मसाला आणि एसआर-१ तंबाखूचे १० पोते असा ३४ लाखाचा गुटखा व १२ लाखाचा ट्रक जप्त केला. प्रविण काळे यांच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात आरोपी सय्यद शकिल, इरफान खान, शेख अमीन, रीजवान खान आणि पप्पु यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शोध पथकाचे  सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल नाईक यांनी अटक केलेल्या चार जणांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना रविवारपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com