हदगावचे आमदार जवळगावकर कोरोना पॉझिटिव्ह-  कार्डियाक अँब्युलन्सने मुंबईकडे रवाना 

अभय कुळकजाईकर
Thursday, 30 July 2020

त्यामुळे त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून पुढील उपचारासाठी मुंबईला गुरूवारी  (ता. ३०) कार्डियाक रूग्णवाहिकेमार्फत हलविण्यात आले आहे. 

नांदेड- कॉग्रेसचे हदगावचे आमदार माधव पाटील जवळगावर यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून पुढील उपचारासाठी मुंबईला गुरूवारी  (ता. ३०) कार्डियाक रूग्णवाहिकेमार्फत हलविण्यात आले आहे. 

आमदार जवळगावकर यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना कोरोना झाल्याचे कळाल्यावर पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेकांनी संपर्क साधला. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मुंबईला नेण्याचे ठरले. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून कार्डियाक अँब्युलन्सने सकाळी मुंबईला पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले असल्याची  अशी माहिती काँग्रेसचे हिमायतनगर तालुकाध्यक्ष विकास पाटील देवसरकर यांनी आहे.   

लोकांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला होता.              

मागील महिन्यात कोरोना काळात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जनतेत जाऊन लोकांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला होता. त्यातून त्यांना कोरोनाची लागण झाली, पण त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. त्यानंतर नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर  विधान परिषदेतील प्रतोद आमदार अमर राजूरकर यांना कोरोना झाला.

हेही वाचा - Good news: जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्के- जिल्हाधिकारी डाॅ. विपिन

कॉग्रेसच्या चौथ्या आमदारांना कोरोना झाला

आता कॉग्रेसच्या चौथ्या आमदारांना कोरोना झाला आहे. आमदार  जवळगावर यांचा कोरोना अहवाल बुधवारी रात्री पॉझिटिव्ह आला आहे. या आधी त्यांना जनता व वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आल्याने त्यांना होम कॉरंटाईन करण्यात आले होते. दरम्यान त्यांचा पहिला स्वँब अहवाल निगेटिव्ह आला होता. दुसऱ्यांदा वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांच्या अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना नांदेडच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गुरूवारी त्यांना मुंबईला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार  कार्डियाक अँब्युलन्सव्दारे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मुंबईला हलविण्यात आले.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hadgaon MLA Jawalgaonkar Corona positive- Cardiac ambulance leaves for Mumbai nanded news