नांदेड: दुसऱ्या दिवशीही पाऊस; जिल्ह्यात खरिपाचे नुकसान

गेल्या दोन दिवसापासून पुन्हा कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू झाला आहे. बुधवारी (ता. २२) देखील शहरासह जिल्ह्यातील काही भागात पाऊस झाला.
खरीप पिकांचे नुकसान
खरीप पिकांचे नुकसानsakal

नांदेड: जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पुन्हा कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू झाला आहे. बुधवारी (ता. २२) देखील शहरासह जिल्ह्यातील काही भागात पाऊस झाला. मंगळवारी (ता. २१) कंधार, लोहा, हिमायतनगर, अर्धापूर, बिलोली, उमरी, मुदखेड तालुक्यात पाऊस झाला. बुधवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी १२.२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मात्र, सततच्या पावसामुळे खरिप पिकांचे नुकसान होत आहे.

खरीप पिकांचे नुकसान
माहुरात मोठी कारवाई! गुटखा,शस्त्रांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

नांदेड शहर आणि जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून पाऊस होत आहे. बुधवारी देखील सुर्यदर्शन झाले नाही. सोमवारी व मंगळवारी तसेच बुधवारीही जिल्ह्यात पाऊस झाला. हा पाऊस कंधार, लोहा, हिमायतनगर, अर्धापूर, बिलोली, उमरी, मुदखेड या तालुक्यात अधिक झाला. दरम्यान सततच्या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकासह मुग तसेच ज्वारीचे नुकसान होत आहे.

काही ठिकाणी कपाशीत पाणी साचल्याने पिके पिवळी पडत आहेत. मंगळवारी कलंबर मंडळात ५६ मिलीमीटर, अर्धापूर ४९, सोनखेड ४६, हिमायतनगर ३४, जलधारा ३४, मोघाळी ३१, बारड २७, उस्माननगर २६, बारुळ २४, मांजरम २४, कुरुळा २२, वाई व रामतीर्थ मंडळात २१ मिलीमीटर पाऊस झाला.

हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदी काठावरील डोल्हारी, बोरगडी, सिरपल्ली, पळसपूर, हिमायतनगर येथील अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या शेतात पाणी साचले. ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे नुकसान झाले आहे. शासनाने हिमायतनगर तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तालुकानिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये

नांदेड : १.९०, बिलोली : १२.६०, मुखेड : सहा, कंधार : १८.७०, लोहा : २५.३०, हदगाव : ५.३०, भोकर : १७.६०, देगलूर : ६.४०, किनवट : १४.७०. मुदखेड : १७.३०, हिमायतनगर : २३.१०, माहूर : १०.२०, धर्माबाद : सहा, उमरी : १२.५०, अर्धापूर : २१.३०, नायगाव : १२.६०. सरासरी - १२.२० मिलीमीटर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com