Nanded Rain: संततधार पावसाने नाले - ओेढे झाले वाहते

यंदाच्या मोसमात महागाईचे खत बियाण्यांची पेरणी केल्यानंतर सुरूवातीच्या पावसानंतर शेतकरी पेरता झाला होता
raining
rainingraining

मुखेड (नांदेड): मृगाच्या मुहुर्तावर पेरणी केलेल्या शेतक-यांचा दुबार पेरणीसाठी जीव धाकधूक होत असतानाच अधून मधून आलेल्या पावसाने दिलासा दिला असला तरी गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या संततधार पावसामुळे मात्र शेतक-यांची अजूनच पंचाईत झाली आहे. एकीकडे झडीच्या पावसाने परिसरातील नाले, ओढे खळाळते झाले आहेत. खळाळत्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी उतारावरील माळरान शेतजमीनी खरवडून शेतक-यांचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे शेतात साचलेल्या पाण्यामुळे आंतरमशागत रखडल्याने पिकातील गवताच्या वाढीचा जोर वाढला आहे. यामुळे शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाल्याचे चित्र दिसत आहे.

यंदाच्या मोसमात महागाईचे खत बियाण्यांची पेरणी केल्यानंतर सुरूवातीच्या पावसानंतर शेतकरी पेरता झाला होता. मात्र नंतर दिलेल्या उघडीपीमुळे शेतक-यांचा जीव टांगणीला लागला होता. त्यातच थोड्या फार झालेल्या पावसाने पीकांना जीवनदान मिळत गेले. मात्र, गेल्या दोन - तीन दिवसापासून होत असलेल्या संततधार पावसामुळे पहिल्या दिवशी शेतकरी चांगलाच आनंदी दिसत होता. परंतु तिस-या दिवशीच्या पावसाने मात्र शेतक-यांचे लक्ष सैरभैर झाले असून शेत शिवारात साचलेल्या पाण्यामुळे पिके पिवळी पडून व गवताचा जोर वाढणार असल्याची चिंता शेतक-यांतून व्यक्त केली जात आहे.

raining
Parbhani Rain: मानवत तालुक्यात पाच हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली

पीक विम्याच्या मदतीची गरज
गेल्या दोन तीन वर्षापासून होत असलेल्या अवेळी पावसामुळे ऐन भरात पाऊस न होणे, पीक काढणीच्या वेळी पावसाची दमदार हजेरी या प्रतिकुल पावसामुळे शेतकरी पिक चांगले येऊन सुद्धा दुष्काळ सदृश्य परिस्थितीशी सामना करीत होता. त्यातच भरलेल्या पिक विम्याचे त्या त्या वेळी आॅनलाइन तक्रारी करण्याच्या पद्धतीमुळे काही शेतक-यांना जमले तर काहींना जमलेच नाही. यामुळे पीक विमा भरून सुद्धा शेतक-यांना मदतीपासून वंचित रहावे लागले होते. यंदाच्या मोसमात सुद्धा शेतक-यांनी मोठ्या प्रमाणावर पीक विमा भरला असून पिवळे पडत असलेल्या पिकांची स्थिती पाहता शेतक-यांना पीक विम्याच्या मदतीची गरज असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.

raining
Rain Updates: निम्म्या मराठवाड्याला पावसाने झोडपले

पिण्याच्या पाण्याचे संकट टळले
दोन तीन दिवसापासून होत असलेल्या संततधार पावसामुळे सरासरी पाऊस झाला असला तरी नदी, नाले, ओढे वाहते झाले आहेत. तसेच जामखेड, मंग्याळ, शिरूर दबडे, वर्ताळा, सांगवी, कामजळगा, दापका राजा, चांडोळा येथील लघु व मध्यम प्रकल्प जवळपास भरण्याच्या उंबरठ्यावर आहेत. मुखेड शहराला पाणी पुरवठा होणा-या कुंद्राळ धरणातील जलसाठाही समाधानकारक असल्याने तालुक्यात यंदा तरी सद्यस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट टळल्याची परिस्थिती दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com