esakal | अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर आता बोटीद्वारे करडी नजर
sakal

बोलून बातमी शोधा

अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर आता बोटीद्वारे करडी नजर

जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थिती व नदीतील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने आता बोटीद्वारे प्रयत्न सुरु केले आहेत. त्याची प्रत्यक्ष पाहणी जिल्हाधिकारी डॉ. विपीन, आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यासह अधिकाऱ्यांनी शनिवारी केली. 

अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर आता बोटीद्वारे करडी नजर

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थिती व नदीतील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने चार नवीन बोटींची इतर अत्यावश्यक साधनांसह खरेदी केली आहे. या बोटींचे आज तांत्रिक समितीद्वारे तपासणी करुन या बोटींना जिल्हा प्रशासनाच्या ताफ्यात सहभागी करून घेतले. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी या बोटींची पाहणी केली.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, नांदेडचे तहसीलदार सारंग चव्हाण, नायब तहसीलदार मुगाजी काकडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे, अग्निशमन अधिकारी रईस पाशा यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, विभागप्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा - नांदेडकरांनो सावधान : ‘कोरोना’चा पाश आवळला जातोय...

वाळूचा उपसा रोखणे गरजेचे
सध्या कोरोना आणि लॉकडाउनमुळे जिल्हा प्रशासनासह महापालिका व इतर विभाग प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात गुंतले आहेत. त्याचा फायदा वाळू माफियांनी घेतला आहे. नांदेड शहरासह जिल्ह्यातील नदीच्या काठावर वाळू उपसा करणाऱ्यांची संख्या वाढल्याने जिल्हा प्रशासनाने महसूल विभागामार्फत कारवाई सुरु केली आहे. तरी देखील वाळू माफिया रात्रीच्या वेळी किंवा निमर्नुष्य असलेल्या ठिकाणी थर्माकॉल बोटींच्या साह्याने वाळू उपसा करत आहेत. त्यांच्यावरील कारवाईसाठी जिल्हा प्रशासनाने पथकांची स्थापना केली असून त्याद्वारे नदीकाठी फिरुन पथके कारवाई करत आहेत. 

चार बोटीद्वारे गस्त घालणार
या चार बोटींपैकी दोन बोटी या नांदेड शहरासाठी तर एक बोट हदगाव तहसिल व एक बोट नायगाव तहसीलकडे सुपूर्द केली जाणार आहे. त्याचबरोबर या बोटीसमवेतच प्रत्येक तालुक्याला लाईफ जॅकेट, लाईफ बॉय, सॉ कटर, रेस्क्यू रोप, मेगा फोन, फर्स्ट एड किट, फोल्डेबल स्ट्रेचर, टूल कीट इत्यादी शोध व बचाव साहीत्य दिले जाणार आहे. प्रत्येक तहसील कार्यालयातील दोन कर्मचारी याप्रमाणे बोट चालविण्याचे प्रशिक्षण मास्टर ट्रेनरद्वारा दिले जाणार आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - मातृत्व वंदना योजनेचा ४५ हजार महिलांना लाभ

विष्णुपुरी येथे प्रशिक्षण सुरु
दरम्यान, शनिवारी (ता. चार) तसेच रविवारी (ता. पाच) देखील तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना याबाबतचे प्रशिक्षण मास्टर ट्रेनरद्वारा देण्यास सुरुवात झाली आहे. अग्निशमन अधिकारी रईस पाशा आणि त्यांच्या मास्टर ट्रेनर यांनी त्यांना प्रशिक्षण दिले आहे. या बोटीमुळे आता प्रशासनाला कारवाई करणे सोपे जाणार आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. विपीन, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यासह इतरांनी विष्णुपुरी प्रकल्पात बोटीद्वारे फिरुन माहिती घेतली. 


  

loading image