esakal | मुक्रमाबाद परिसरात विज पडून घर जळून दोन लाखाचे संसारोपयोगी साहित्य खाक

बोलून बातमी शोधा

आग लागुन घर जळाले

मुक्रमाबाद परिसरात विज पडून घर जळाले; दोन लाखाचे संसारोपयोगी साहित्य खाक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुक्रमाबाद (जिल्हा नांदेड) : घरात उकाडा होत असल्यामुळे घरातील सर्वजण घरा बाहेर झोपले असताना अचानक आलेल्या वादळी पावसात विज पडून घराला लागलेल्या भिषण अगीत घरातील दोन लाखाचे संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. घरातील सर्व लोक घराच्या आवारात झोपल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मुक्रमाबादपासून जवळच असलेल्या तग्याळ येथील गोंविद विठ्ठलराव भिंगोले. हे दिवसभर काम करुन शेतात असलेल्या घरात राहत होते. घरात जास्त उकाडा होत असल्यामुळे आपल्या कुटुंबाला घेऊन घराबाहेर झोपले होते. पण अचानक विजेच्या कडकडाटसह वादळी पाऊस सुरु झाला. पाऊस पडत असल्यामुळे सर्व लोक घरात जाण्यासाठी धावपळ करीत असतानाच अचानक घरावर वीज पडून घराला मोठी आग लागली.

हेही वाचा - वसमतमध्ये १०० बेडचे विनामुल्य कोविड सेंटर चालवणार; कन्हैया बाहेतीनी मागितली परवानगी

हवा जास्त असल्यामुळे आगीने पुर्ण घराला कवेत घेतले. आग एवढी मोठी होती. की, घरात असलेले संसार उपयोगी साहित्य बाहेरही काढता येत नव्हते. जीवाच्या अंकाताने आरडाओरडा करुन गावातील लोक धावून आली. तोपर्यंत बराच वेळ झाला होता. या अगीत घरात ठेवलेले सर्व संसार उपयोगी असलेले ज्वारी, दाळ, कपडे, खाट, तांदूळ यासह साहित्य जळून खाक झाले. तलाठी बी.डी. कदम यांनी पंचनामा केला.

संपादन- प्रल्हाद कांबळे