नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघात वाळूची वाहतूक ट्रॅक्टरने होणार!

नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघात वाळूची वाहतूक ट्रॅक्टरने होणार!
Updated on
Summary

राज्य सरकारने त्यांच्या मागणीची दखल घेत वाळूची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना म्हणजेच हायवा, टिप्पर यांना बंदी घातली. यापुढे ट्रॅक्टरद्वारे वाळूची वाहतूक करावी, असे सुचित केले असल्याची माहिती आ. पवार यांनी दिली.

नांदेड : वाळू घाटावरून वाळू उपसा करणाऱ्या अवजड वाहनांमुळे मतदारसंघातील रस्ते खराब होत असल्याची तक्रार करत नायगावचे आ. राजेश पवार (MLA Rajesh Pawar) यांनी मुंबईत मंत्रालयाच्या दारात उपोषण केले होते. अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून आता नायगाव विधानसभा मतदारसंघात अवजड वाहनांऐवजी ट्रॅक्टरद्वारे वाळू नेण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. (In Naigaon constituency of nanded district, sand will be transported by tractor)

नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघात वाळूची वाहतूक ट्रॅक्टरने होणार!
नांदेड जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत तरुणांच्या गळ्याला कोरोनाचा फास

नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघातील नायगाव, उमरी आणि धर्माबाद तालुक्यात वाळू घाटावरून अवजड वाहनाने वाळूची वाहतूक केली जात होती. त्यामुळे मतदारसंघातील रस्ते मोठ्या प्रमाणावर खराब होत होते. याबाबत आ. राजेश पवार यांनी प्रशासनाकडे निवेदन देऊन ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक करण्याची मागणी केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आ. पवार यांनी गेवराईचे आ. लक्ष्मण पवार यांच्यासह मंत्रालयाच्या दारामध्ये उपोषण केले होते. अखेर राज्य सरकारने त्यांच्या मागणीची दखल घेत वाळूची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना म्हणजेच हायवा, टिप्पर यांना बंदी घातली. यापुढे ट्रॅक्टरद्वारे वाळूची वाहतूक करावी, असे सुचित केले असल्याची माहिती आ. पवार यांनी दिली.

नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघात वाळूची वाहतूक ट्रॅक्टरने होणार!
Good News : नांदेड जिल्ह्यात कोरोना काळात ८७ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन

महसूल व वन विभागाचे अवर सचिव दि. रा. चव्हाण यांनी याबाबत आदेश काढले असून त्याची प्रत औरंगाबादचे विभागीय आयुक्त आणि नांदेडचे जिल्हाधिकारी यांना गुरूवारी (ता. २०) दिली आहे. नायगाव विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात प्रायोगिक तत्वावर एक विशेष बाब म्हणून वाळू वाहतूक केवळ ट्रॅक्टर याच वाहनाद्वारे करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, असे त्यात नमूद केले असल्याची माहिती आ. श्री. पवार यांनी दिली.

गोदावरी नदीपात्रातून वाळूचा मोठा उपसा होत असून अवजड वाहनांतून वाळू वाहतूक होत असल्यामुळे रस्ते मोठ्या प्रमाणावर खराब झाले आहेत. त्यामुळे नायगाव मतदारसंघात ट्रॅक्टरच्या साह्यानेच वाळूची वाहतूक करावी तसेच वाळूच्या वाहतुकीने खराब झालेल्या रस्त्यांना तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार माझ्या लढ्याला यश आले असून त्याची अंमलबजावणी व्हावी.

- राजेश पवार, आमदार, नायगाव (जि. नांदेड.)

(In Naigaon constituency of nanded district, sand will be transported by tractor)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com