esakal | नांदेड जिल्ह्यात 490 व्यक्ती कोरोना बाधित

बोलून बातमी शोधा

नांदेड जिल्ह्यात 490 व्यक्ती कोरोना बाधित

जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 82 हजार 476 एवढी झाली असून यातील 72 हजार 309 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.

नांदेड जिल्ह्यात 490 व्यक्ती कोरोना बाधित
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात मंगळवारी प्राप्त झालेल्या 2 हजार 77 अहवालापैकी 490 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर (RTPCR) तपासणीद्वारे 347 तर अँटिजेन तपासणीद्वारे(Antigen detection) 143 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 82 हजार 476 एवढी झाली असून यातील 72  हजार 309  रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 8  हजार 263 रुग्ण उपचार घेत असून 215 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क (Mask), सॅनिटायझर (Sanitizer), सुरक्षित अंतर (Social distance)आणि लसीकरण (Vaccination) याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. (In Nanded district 490 people have been infected with corona)

 (ता. 3 ते 4) मे या दोन दिवसांच्या कालावधीत 15 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 639 एवढी झाली आहे. दिनांक 3 मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी मुखेड येथील 28 वर्षाचा पुरुष, लोहा येथील 70 वर्षाची महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे हदगाव येथील 80 वर्षाचा पुरुष, सिडको नांदेड येथील 83 वर्षाची महिला, जुना कौठा नांदेड येथील 58 वर्षाचा पुरुष, प्रकाश नगर नांदेड येथील 70 वर्षाचा पुरुष, नायगाव येथील 60 वर्षाचा पुरुष, गोदावरी कोविड रुग्णालय येथे वामन नगर नांदेड येथील 60 वर्षाचा पुरुष 4 मे 2021 रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे नांदुसा नांदेड येथील 85 वर्षाचा पुरुष, हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथील 50 वर्षाचा पुरुष, शिवाजीनगर नांदेड येथील 55 वर्षाची महिला, देगलूर येथील 44 वर्षाचा पुरुष, अंचोली तालुका नायगाव 60 वर्षाचा पुरुष, किनवट कोविड रुग्णालय किनवट तालुक्यातील मोहापूर येथील 65 वर्षाचा पुरुष, गोदावरी कोविड रुग्णालय येथे देगलूर येथील कळसकर गल्ली येथील 56 वर्षाचा पुरुष यांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.67 टक्के आहे.

हेही वाचा: महावितरणच्या नांदेड परिमंडळात कोव्हिड गृह विलगीकरण कक्ष

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 147, बिलोली 4, हिमायतनगर 5, माहूर 1, उमरी 10, हिंगोली 3, नांदेड ग्रामीण 12, देगलूर 25, कंधार 11, मुदखेड 5, यवतमाळ 8, निजामाबाद 1, अर्धापूर 6, धर्माबाद 2, किनवट 33, मुखेड 5, परभणी 4, हैद्राबाद 1, भोकर 12, हदगाव 15, लोहा 23, नायगाव 13, बीड 1 असे एकूण 347 बाधित आढळले.

 आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात 32, बिलोली 6, उमरी 3, माहूर 14, मुदखेड 6, नांदेड ग्रामीण 10, देगलूर 2, कंधार 6, मुखेड 1, लातूर 1, अर्धापूर 24, धर्माबाद 3, किनवट 8, नायगाव 7, यवतमाळ 3, भोकर 2, हदगाव 4, लोहा 3, हिंगोली 8  व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे 143 बाधित आढळले.

 आज जिल्ह्यातील 1 हजार 44 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 15, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 637, धमार्बाद तालुक्यातंर्गत 9, देगलूर कोविड रुग्णालय 10, अर्धापूर तालुक्यातंर्गत 22, उमरी तालुक्यातंर्गत 35, मालेगाव टीसीयु कोविड रुग्णालय 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 13, मुखेड कोविड रुग्णालय 31, मुदखेड कोविड सेंटर 10, किनवट कोविड रुग्णालय 12, हिमायतनगर तालुक्यातर्गंत 28, बिलोली तालुक्यातंर्गत 6, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 6, हदगाव कोविड रुग्णालय 9,  कंधार तालुक्यातंर्गत 3, मांडवी कोविड केअर सेंटर 3, लोहा तालुक्यातंर्गत 33, भोकर कोविड केअर सेंटर 20, खाजगी रुग्णालय 140 बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली .

हेही वाचा: नांदेड : जंगमवाडी ते श्रीनगरपर्यंतचा नादूरुस्त रस्ता पावसाळ्यापुर्वी सुरु करा

आज 8 हजार 263 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय 129, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 77, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ( नवी इमारत) 115, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 47, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 80, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 66, देगलूर कोविड रुग्णालय 29, जैनब कोविड हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 15, बिलोली कोविड केअर सेंटर 85, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1, नायगाव कोविड केअर सेंटर 18, उमरी कोविड केअर सेंटर 27, माहूर कोविड केअर सेंटर 24, भोकर कोविड केअर सेंटर 8, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 32, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 39, कंधार कोविड केअर सेंटर 16, धर्माबाद कोविड केअर सेंटर 49 , मुदखेड कोविड केअर सेंटर 14, अर्धापूर कोविड केअर सेंटर 12, बारड कोविड केअर सेंटर 25, मांडवी कोविड केअर सेंटर 8, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 5, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 40, एनआरआय कोविड केअर सेंटर 55, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 96 ,  नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 3 हजार 397, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 2 हजार 76, खाजगी रुग्णालय 1 हजार 678, असे एकूण 8 हजार 263 उपचार घेत आहेत. 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 40, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 35, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 51 , भक्ती  जम्बों कोविड केअर सेंटर 25 खाटा उपलब्ध आहेत.

हेही वाचा: नांदेड : तेंदुपत्ता खरेदी बंद झाल्याने दुर्गम भागातील रोजगार वंचित

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 70 हजार 792

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 78 हजार 568

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 82 हजार 476

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 72  हजार 309

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 639

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.67 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-29

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-25

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-370

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 8 हजार 263

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-215

(In Nanded district 490 people have been infected with corona)